🌟परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सहकार मंत्री अतुल सावें यांनी दिली सदिच्छा भेट...!


🌟बँकेच्या व सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी राज्य शासन बँकेच्या सदैव पाठीशी राहील - सहकार मंत्री अतुल सावे


परभणी (दि.१२ मे २०२३) : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आज सहकार मंत्री अतुल सावे यांनी सदिच्छा भेट बँकेच्या व्यवहारांबाबत माहिती घेतली. बँकेने ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या सर्व सोयीसुविधा आणि कामकाज पाहता बँक करीत असलेल्या प्रगती व उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. बँकेच्या व सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी राज्य शासन बँकेच्या सदैव पाठीशी राहील, असे प्रतिपादन सहकार मंत्री अतुल सावे यांनी केले. 

यावेळी बँकेच्या वतीने अध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालक आनंद भरोसे, विभागीय सह निबंधक योगीराज सुर्वे, प्रभारी जिल्हा उपनिबंधक माणिक भोसले, सहकार विभागाचे अधिकारी श्री. यादव, श्री. अब्दागीरी, श्री. भोसले. श्री. तायडे, विशेष लेखा परीक्षक श्री. भोसले, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. कुरुंदकर, सरव्यवस्थापक आर. व्ही मौजकर उपस्थित होते. 

यावेळी बँकेचे स्वंतत्र डाटा सेंटर, प्रत्येक तालुक्यात एटीएम सुविधा, ग्रामीण भागासाठी एटीएम व्हॅन, स्वतंत्र पोर्टलव्दारे शासनाच्या विविध अनुदान त्यात शेतक-यांचा दुष्काळ अनुदान, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, निराधारांचा निधी आदि सभासदांच्या खात्यात थेट जमा व तात्काळ वितरण, आरटीजीएस व एनईएफटी सुविधा, एस. एम. एस सुविधा, बँकेचा सभासदांना बँक खात्याचा शेवटचा चार व्यवहाराचा खातेउतारा त्याचा मोबाईलवर, पॉश मशिनव्दारे पेमेंट, तसेच ठेवीत व वसुलीत होणारी दरवर्षी लक्षणीय वाढ, बँकेस ऑडीट ए वर्ग, वैयक्तीक पगारदार नौकरांना २५ लाखाचे त्वरीत वितरण, एनपीएमध्ये घट, लवकरच सोने तारण कर्ज वितरण, बँकेस कर्मचा-यांना ड्रेस कोड व हजेरी थम मशीन व्दारे आदी सुविधा असल्याचे श्री. वरपुडकर यांनी सांगितले. 

बँकेने केलेले कार्य व पुढील भावी योजनासंबंधी बँकेचा लेखाजोखा सहकारमंत्र्यांना सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँक अधिकारी राजू सोनवणे यांनी केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या