🌟पुर्णा तालुक्यातील मौजे दस्तापुरात शेतकरी शेती शाळा संपन्न....!


🌟निंबोळी अर्काचा वापर करणे गरजेचे : पुर्णेचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापकांचे शेतकऱ्यांना निर्देश🌟


पुर्णा (दि.२५ मे २०२३) - विभागीय कृषी सहसंचालक लातूर विभाग लातूर श्री साहेबराव दिवेकर यांचे आदेशानुसार तसेच प्रकल्प संचालक आत्मा परभणी दौलत चव्हाण सर व तालुका कृषी अधिकारी पूर्णा आबासाहेब देशमुख सर यांचे मार्गदर्शनाखाली पर्यावरण पूरक जीवन पद्धती अभियान सप्ताह निमित्त मौजे दस्तापुर तालुका पूर्णा येथे शेतकरी शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते सदरील शेती शाळेमध्ये उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास जोशी यांनी सोयाबीन बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच 70 टक्के पेक्षा जास्त उगवण क्षमता असेल तर शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरण्याचे आवाहन केले सोयाबीन बियाण्याची पेरणी टोकन पद्धतीने अथवा बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे करावी जेणेकरून एक एकरी जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल व बियाण्यासाठी लागणारा खर्च कमी करता येईल शेतकरी गटातील शेतकऱ्यांनी कमीत कमी दोन क्विंटल निंबोळी जमा करावी व पाच टक्के निंबोळी अर्काचा वापर कसा करावयाचा याविषयी जोशी यांनी सांगितले माती परीक्षण करूनच खतांचा वापर करण्याचे देखील सुचविले सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक रवी माने यांनी सोयाबीन मध्ये बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर व त्यापासून होणारे फायदे याविषयी मार्गदर्शन केले पावसाळ्यामध्ये बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर केल्यास जास्त असणारे पाणी सरी द्वारे निघून जाते तसेच पाण्याची कमतरता असेल  तर उपलब्ध पाण्यामध्ये सोयाबीनची वाढ चांगली होऊन उत्पन्न वाढते असे देखील माने यांनी सांगितले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या