🌟संभाजीनगर जिल्ह्यातील रासायनिक खते व बी-बियाणांचे बोगस धंदे करणाऱ्यांवर कारवाई करा....!


🌟विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी🌟 

छत्रपती संभाजीनगर (दि.११ मे २०२३) : जिल्ह्यात बोगस रासायनिक खते,बी- बियाण्यांचा मोठा गोरख धंदा सुरू असून ते विकत असलेल्या कंपनी व वितरकांची माहिती घेऊन त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

    छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे 2023 च्या खरीप हंगामा संदर्भात आढावा आज बैठक आयोजित करण्यात आली होती. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्हाभरात शेतीच्या बाबतीत करण्यात येत असलेल्या नियोजनाची माहिती घेतली व प्रशासनाला विविध सूचना केल्या.

तसेच अंबादास  दानवे यांनी जिल्ह्यात असलेल्या शेती संदर्भातील विविध प्रश्नांची माहिती यावेळी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना विचारली. बैठकीदरम्यान अंबादास दानवे म्हणाले की, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टी, सततचा पाऊस, गारपीठ यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे जिल्ह्याभरात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणाली द्वारे किती शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आलेली आहेत, याची काही आकडेवारी प्रशासनाकडे आहे का ? तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन सुद्धा भरपाई पासून अपात्र ठरविण्यात आलेले आहेत अशा शेतकऱ्यांची आकडेवारी सुद्धा किती आहेत याचीही माहिती त्यांनी यावेळी मागितली.

 तसेच पिकविमा कंपन्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जिल्ह्याच्या ठिकाणी पिकविमा कंपन्यांचे कार्यालय बंद असतात व अनेकदा अधिकारी सुद्धा याप्रसंगी उपस्थित नसतात.त्यांचे नावे व संपर्क असे काहीही माहित नसते. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळाले नाही तर त्यांना तक्रार करण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नसतो. यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरातील पिकविम्यासाठी कार्यरत कंपन्यांची नावे व संपर्क क्रमांक जिल्हाधिकारी कार्यालय येथे लावून देण्यात यावे ज्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री संदिपान भुमरे केंद्रीय मंत्री भागवत कराड,मंत्री अतुल सावे, खा.इम्तियाज जलील हरिभाऊ बागडे,जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना उपस्थीत होते....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या