🌟महाराष्ट्र दिना निमित्त कंत्राटी स्वच्छता कामगार व घरकाम करणाऱ्या गोर गरीब कष्टकरू महिलाना साड्या वाटप....!


🌟गोर गरीब कष्टकरू महिलानां प्रोत्साहन देण्यासाठी साड्याचे वाटप🌟

गंगाखेड (दि.०२ मे २०२३) - गंगाखेड येथील समाज सेविका हिराताई पुंड व मीराताई सुर्यवंशी यांच्या हस्ते गंगाखेड नगर परिषदेतील कंत्राटी स्वच्छता कामगार व घरकाम करणाऱ्या गोर गरीब कष्टकरू महिलानां प्रोत्साहन देण्यासाठी साड्याचे वाटप करण्यात आले.


गंगाखेड शहरातील नवा मोंढ्यातील कृष्णकुंज कार्यालयात साड्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला सकाळी १०-०० वाजेपासून सायंकाळ पर्यंत साड्या चे वाटप सुरू होते व यावेळी महिलांनी उदंड प्रतिसाद देत शेकडो च्या संख्येने महिला उपस्थित होत्या यावेळी कामगार महिलांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी व त्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्या संदर्भात प्रयत्न करणार असल्याचे सांगितले  या कार्यक्रमास मनसे तालुका अध्यक्ष राहुलभाऊ डोंगरे, आकाश जामगे,मयुर गंगाखेडकर, गजानन भुसणर,तालुका उपअध्यक्ष निखिल राठोड, मंदार कुलकर्णी शहर उपाध्यक्ष,धारासुर सर्कल अध्यक्ष अनिरुद्ध मोरे,साई टाक, संतोष उफाडे, संतोष कुंभार, बालाजी भुजबळ व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या