🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आयटकच्या वतीने जोरदार धरणे आंदोलन....!


🌟कंत्राटी नर्सेसच्या मानधनात भरघोस वाढ करावी, खात्यातील रिक्त पदे त्याचे समायोजन करण्याची मागणी🌟 

परभणी (दि.१७ मे २०२३) : राज्याच्या आरोग्य खात्यातील कंत्राटी नर्सेसच्या मानधनात वाढ करावी तसेच त्यांना नौकरीवर कायम करावे यासह अन्य मागण्यांकरीता आयटक या संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह सदस्यांनी आज बुधवार दि.१७ मे २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन केले.


                आरोग्य खात्यातील कंत्राटी एएनएम/जीएनएम सेवा बजावत आहेत. परंतु, अतिशय तुटपुंज्या मानधनावर या सर्व कर्मचार्‍यांना काम करावे लागत आहे. त्यामुळे या कंत्राटी नर्सेसच्या मानधनात भरघोस वाढ करावी, खात्यातील रिक्त पदे त्याचे समायोजन करावे यासह अन्य मागण्यांकरीता आयटकद्वारे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. या मागणीसाठीच बुधवारी संतप्त नर्सेससह सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन केले.

               यावेळी संघटनेच्या वर्षा घोबाळे,वर्षा मुंढे,अंजली राठोड, आरती शिंदे, यशोधरा लोखंडे, माला दाभाडे, आशा भालेराव, समता कदम, मनिषा भदर्गे, आरती झंपलकर, अयोध्या कदम, सरिता भालेराव, सुप्रिया डांगे, शरयु लटपटे, कनिस पठाण, प्रिया ढेरे व अन्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या आंदोलनकर्त्यांची अ‍ॅड. माधुरी क्षीरसागर यांच्यासह अन्य नेतेमंडळींनी भेट घेतली.

🌟आयटच्या आंदोलनास खा.संजय जाधव यांच्यासह मनसे जिल्हा सरचिटणीस लाहोटी यांचाही पाठींबा :-

परभणी जिल्ह्याचे माननीय खासदार संजय जाधव महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंट्रक्शन यांच्या आयटक संलग्न एक दिवसीय आंदोलनात येऊन पाठिंबा दिला

परभणी जिल्ह्याचे मनसेचे सरचिटणीस सोनू लाहोटी साहेब महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनच्या एक दिवसीय आंदोलनात येऊन पाठिंबा दिला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या