🌟पुर्णा शहरातील अर्धाच्यावर भाग कालपासून अंधेरात : परभणी लोहमार्गावरील रेल्वे पुलाखालून गेलेले केबल झाले भस्ट....!


🌟महावितरचे अधिकारी लागले कामाला तेवीस तासाचा कालावधी उलटल्यानंतर देखील कामात प्रगती नाही🌟 


पुर्णा (दि.२३ मे २०२३) - पुर्णा शहरातील अर्धाच्या वरील भाग काल सोमवार दि.२२ मे २०२३ रोजीच्या रात्री ०९-०० वाजेपासून अंधारात असून भर कडक उन्हाळ्याच्या दिवसात सतत दोन दिवस लाईट नसल्यामुळे नागरिकांमध्ये हाहाकार माजला असून अबालवृध्द लहान लेकर तसेच बिमार पडलेल्या रुग्नाच्या जिवाची अक्षरशः लाहीलाही होत आहे या संदर्भात महाराष्ट्र राज्या विद्युत  महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता महावितरणचे अधिकारी सांगत आहेत की पुर्णा-परभणी लोहमार्गावरील रेल्वे पुलाखालून गेलेले केबल भस्ट झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला असून भस्ट झालेले केबल बदलण्याचे काम सुरु आहे.  

पुर्णा-परभणी लोहमार्गावरील रेल्वे पुलाखालील केबल दुरुस्तीचे काम महावितरचे अधिकारी/कर्मचारी कालपासून करीत असून या केबल दुरुस्तीच्या कामाला आज मंगळवार दि.२३ जुन रोजी रात्री ०९-०० वाजता चोवीस तासाचा कालावधी पुर्ण होईल परंतु अद्यापही काम पुर्णत्वास गेले नसल्यामुळे आजची रात्र देखील अंधारात जाते की काय ? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे....  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या