🌟डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणण्याची खरी गरज.....!


 🌟ज्योतीताई बगाटे यांचे प्रतिपादन🌟


पुर्णा (दि.०४ मे २०२३) - पुर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथे दि.२८ एप्रिल २०२३ रोजी सार्वजनिक भीम बुद्ध जयंती मंडळ सम्राट अशोक मित्र मंडळ आहेरवाडी यांच्यावतीने विविध प्रबोधनात्मक समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रक्तदान शिबिरासह 18 तास अभ्यास,वृक्षारोपण,रांगोळी स्पर्धा,पाली भाषा परीक्षा आदीं  उपक्रमाचे आयोजन यशस्वीपणे जयंती मंडळाकडून केल्या गेले दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ०९-०० वाजता पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

पूर्णा तालुका भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने समता सैनिक दलाचे मेजर नरेंद्र सोनुले यांच्या नेतृत्वाखाली सलामी देण्यात आली जयंती मंडळातर्फे राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण जिल्हा कोषागार अधिकारी ज्योतीताई बगाटे भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे सामाजिक कार्यकर्ते सुनील मगरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गौतम दिपके यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ज्योतीताई बगाटे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणून त्यांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण करावा असे आव्हान केले त्यांच्यातर्फे सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिकेला दहा ग्रंथ देण्याचे अभिवचन दिले यावेळी गावकरी आंबेडकर प्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या