🌟जिल्हा पोलिस दलाने ०९ फरार आरोपींना केली अटक🌟
परभणी (दि.१८ मे २०२३) : परभणी जिल्ह्यातील विविध गुन्ह्यातील फरार आरोपींना शोधण्याकरीता जिल्हा पोलिस दलाने मोहिम हाती घेतली असून या मोहिमे अंतर्गत ०९ फरार आरोपींना अटक केली आहे.
परभणी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमधून अभिलेखांवर पाहिजे व फरारी असलेल्या आरोपींना अटक करण्याकरीता पोलिस अधिक्षक आर.रागसुधा व अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण यांच्या अधिपत्त्याखाली उपविभागानुसार सहा विशेष पथके नेमण्यात आले आहेत. ०४ ते १७ मे दरम्यान या विशेष पथकाने मोहिमेतून १२३ पैकी ०९ फरार आरोपी ताब्यात घेतले १० गैरजमानती वारंट तामील करण्यातही पोलिसांना यश आले आहे.....
0 टिप्पण्या