🌟परभणीच्या जिल्हाधिकारी गोयल यांच्या प्रस्तावामुळे भाऊचा तांडा येथील मृताच्या वारसांना २५ लाखांचे अर्थसहाय मंजूर...!


🌟राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता🌟

परभणी (दि.१४ मे २०२३) :- सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा, शेळगावातील शेतामधील सेप्टीक टँकची सफाई करताना मृत पावलेल्या ५ सफाई कामगारांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईपोटी प्रत्येकी ५ लाख रुपयांचे अर्थ सहाय आज मंजूर करण्यात आले. मृताच्या वारसांना तात्काळ अर्थसहाय मंजूर व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी शासन दरबारी प्रस्ताव पाठवला होता. 

हाताने मैला उचलणा-या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम २०१३ नुसार जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी प्रस्ताव पाठवला होता हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे, अधिनियम २०१३ अंतर्गत महाराष्ट्र राज्यात दूषित गटारामध्ये उतरुन काम करताना मृत झालेल्या मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स यांच्या वारसांना १० लाख नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याची तरतूद आहे. या तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णय दि. १२ डिसेंबर २०१९ अन्वये दूषित गटारामध्ये मृत्यू पावलेल्या मॅन्यूअल स्कॅव्हेंजर्सना सफाई कामगारांना नुकसानभरपाई अदा करण्यात येते. 

यानुसार परभणीच्या जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी आज समाजकल्याण व विशेष सहाय  विभागास सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने दिनांक ११ मे २०२३ रोजी रात्री ९ च्या सुमारास भाऊचा तांडा, ग्रामपंचायत शेळगाव, ता. सोनपेठ, जिल्हा परभणी येथील श्री. परमेश्वर दगडू राठोड यांच्या शेत वस्तीवरील घराचे सेप्टिक टैंकमधील मैला सफाईचे काम करताना दूषित टाकीत पडून मृत्यू झालेल्या सफाई कामगारांच्या वारसांना विशेष बाब म्हणून प्रत्येकी १० लाख रुपये अदा करण्यास या शासनाने मंजुरी दिली आहे.

मृतांमध्ये सादीक रहीम शेख, जुनेद दाऊद शेख, शाहरुख सादीक, शेख फेरीज गफार शेख आणि नवीद शेख सर्व रा. सोनपेठ जि. परभणी येथील आहेत. या दुर्घटनेतील ५ मयत मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स यांच्या वारसांना शासन निर्णयास अनुसरुन सद्या बोम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या २५ लाख रुपयेइतक्या रक्कमेतून प्रत्येकी पाच लाख याप्रमाणे निधी मयत पाच सफाई कामगारांच्या वारसांना अदा करण्यासाठी वितरीत करण्यात आला आहे. उर्वरित २५ लाख रुपयांची रक्कम बीम्स प्रणालीवर उपलब्ध झाल्यानंतर त्यांच्या वारसांना वितरीत करण्यात येईल.

मृत मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स यांच्या वारसांना नुकसान भरपाईची रक्कम अदा करताना त्यांच्या वारसांची खात्री पटवून नुकसान भरपाईची रक्कम समाजकल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे व आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांची ओळख पटवून त्यांना ती धनादेशाव्दारे अदा करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच शासन निर्णय दि.१२ डिसेंबर २०१९ नुसार कार्यालये, आस्थापना, संस्था व्यतिरिक्त उर्वरित खाजगी क्षेत्र यांचे प्रमुख त्यांच्या निधीतून प्रकरणी संबंधितांना १० लाख रुपये नुकसानभरपाई देतील, अशी तरतूद आहे. 

त्यामुळे परमेश्वर दगडू राठोड यांच्याकडून ही रक्कम वसूल करुन ती रक्कम संबंधित अधिकारी यांनी दिनांक ३१ मार्च २०२४ पूर्वी या विभागाच्या ८००, इतर जमा रकमा (०१) (०१) इतर जमा रकमा (०२५००१०८) या शिर्षाखाली जमा करावी. ही निधी मागणी क्र.एन-३, (०३) (०३) महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगास सहायक अनुदान (अ.जा.उ.यो.) कार्यक्रम, ३१ सहायक अनुदाने (वेतनेतर) (२२२५२६३१) या लेखाशिर्षाखाली सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पिय तरतूदीतून खर्च करण्यात येणार आहे. 

वित्तीय नियमावली, महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका यानुसार वेळोवेळी वित्त विभागाने निर्गमित केलेल्या अटी व शर्तीनुसार सदर निधी खर्च करुन कोणतीही वित्तीय अनियमितता होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी समाज कल्याण आयुक्तांची राहणार आहे, असा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने राज्य शासनाच्या अवर सचिव अश्विनी यमगर यांनी काढला आहे...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या