🌟हिंदुहृदय सम्राट स्व.शिवसेनाप्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे याचे खरे वारसदार आम्हीच - डॉ.तानाजी सावंत


🌟उध्दव ठाकरे यांनी सत्तेसाठी शिवसेना पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधला असेही ते म्हणाले🌟

परभणी (दि.२६ मे २०२३) - हिंदुहृदय सम्राट स्व.शिवसेनाप्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आम्ही खरे वारसदार आहोत आम्ही खोके घेणारे नसुन देणारे आहोत असा जबदस्त टोला राज्याचे आरोग्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी मारला.परभणी शहरातील पाथरी रस्त्यावरील राजलक्ष्मी मंगल कार्यालयात शिवसेना पक्षाकडून आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आ.डॉ. रत्नाकर गुट्टे,शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा माजी खा.सुरेश जाधव, आयोजक सईद खान सुभाषराव जावळे, रामेश्वर शिंदे, महेश डोंगरे यांची उपस्थिती होती.

आपल्या भाषणात मंत्री डॉ.सावंत यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला टिका टिप्पणी केली. शिवसेनाप्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला आयुष्यभर विरोध केला. मात्र उध्दव ठाकरे यांनी सत्तेसाठी शिवसेना पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधला असे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले सर्व सामान्य कार्यकर्ते यांनी शिवसेना वाढविण्यासाठी रक्ताचे पाणी केले. मात्र सध्या ठाकरे यांचे ड्रायव्हर व पीए पक्ष चालविणार असतील तर ते पक्षातील कोणालाच पटणारे नसल्याने शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी एकनिष्ठ असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीकडे गहान असलेला शिवसेना पक्ष आम्ही सोडवुन आणल्याचे ते म्हणाले. दरम्यान यावेळी प्रास्ताविकात शिवसेना नेते सईद खान यांनी जिल्ह्यातील शिवसैनिकांना बळ देण्यासाठी आपला पाठीशी खंबीरपणे उभे रहावे व पाथरी येथी साईबाबांच्या जन्मभूमी विकास अराख्यास मंजुरी देवून पाथरी शहराचा सर्वांगीण विकास करावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या