🌟केंद्र शासनाच्या योजनांचा चर्मकार बांधवांनी लाभ घ्यावा - श्रीमती एस.व्ही.पराते


 🌟राज्य शासनाचा ‘शासकीय योजनांची जत्रा’ उपक्रम🌟

परभणी (दि.०४ मे २०२३) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गंत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाकडून राज्यातील चर्मकार नागरिकांचे जीवनमान उंचावणे, समाजात मानाचे स्थान मिळण्यासाठी त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी केंद्र शासनाची एन.एस.एफ.डी.सी. योजना राबविण्यात येत आहे. राज्य शासनाच्या ‘शासकीय योजनांची जत्रा’ या उपक्रमांतर्गंत चर्मकार बांधवांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्रीमती एस. व्ही. पराते यांनी केले आहे.

लाभार्थ्याचा विनंती अर्ज, कागदपत्रे खरी असल्याबाबत व ज्या जागी व्यवसाय चालू त्या जागेचे प्रमाणित केलेले छायाचित्र, चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, दोन सक्षम जामिनदारांपैकी नोकरदार असेल तर त्याच्या कार्यालयाचे लाभार्थ्यांने वसुलीचा भरणा न केल्यास जामिनदाराच्या पगारातून कपात करण्यात येईल, असे कार्यालयाचे हमीपत्र, लाभार्थ्याचा जामिनदार किमान  ५ ते ६ वर्षे नोकरी आहे, असा सरकारी नोकरदार असावा.  

जिल्हा व्यवस्थापक यांचा स्थळपाहणी अहवाल व शिफारस, लाभार्थ्याचा सिबील क्रेडिट स्कोअर, अर्जदाराचे वारसदाराच्या स्वाक्षरीसह नामांकन व शपथपत्र, यापूर्वी कर्जाच्या अर्जाबरोबर सादर केलेल्या इतर कागदपत्रांची खातरजमा उदा. जातीचा दाखला, रेशनकार्ड, रहिवाशी दाखला, निवडणूक आयोग ओळखपत्र इ. जोडणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे आधारकार्ड तसेच आधार संलग्न बँक खाते क्रमांक, जी. एस. टी. क्रमांकासह व्यवसायाचे दरपत्रक आणि अर्जदाराचे विहित नमुन्यातील शपथपत्र ही कागदपत्रे दाखल करणे आवश्यक असून, या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीमती पराते यांनी केले आहे.  

तसेच  लाभार्थ्यांनी यापूर्वी एन.एस.एफ.डी.सी. कर्ज योजनेअंतर्गत जुन्या प्रलंबित कर्ज प्रस्तावाबाबत कर्ज प्रस्ताव जिल्हा कार्यालयात दाखल केले असल्यास, किंवा लाभार्थ्यांची समितीकडून निवड झाली असल्यास त्यांचे परिपूर्ण कर्ज प्रस्ताव जिल्हा कार्यालयामार्फत प्रधान कार्यालयास मंजुरीसाठी शिफारस करण्यात आले आहेत, अशा लाभार्थ्यांची यादी महामंडळाच्या सूचना फलकावर लावली आहे. संबंधित अर्जदारांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क करुन  लाभार्थ्याचे उद्योग आधार प्रमाणपत्र सोबत जोडावे, असेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या