🌟परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बालाजी देसाई यांचे बॅंक संचालक पद विभागीय सहनिबंधकांनी केले अपात्र...!


🌟पुर्णा तालुक्यासह जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील अत्यंत मुरब्बी राजकारणी म्हणून बालाजी देसाई ओळखले जातात🌟

परभणी/पुर्णा (दि.२३ मे २०२३) :- परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बालाजी रामराव देसाई यांचे दि.परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित परभणी या बॅंकेचे संचालक पद विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांनी एका आदेशानुसार दि.१९ मे २०२३ रोजी एका सहकार नियमाखाली अपात्र ठरवले आहे. 

पुर्णा तालुक्यासह जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील अत्यंत मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जाणारे शिवसेना ठाकरे गटाचे नेते बालाजी रामराव देसाई हे या आधी दि.परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक पदी निवडून आले होते.त्यांची पूर्णा तालुक्यातील रेगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या संचालक पदी बेकायदेशीर रीत्या एका सभेनुसार नियुक्ती करण्यात आली होती.या व ईतर काही सहकार कायदा नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी धानोरा मोत्या येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन पांडुरंग लक्ष्मण डाकोरे यांनी देसाई यांच्या विरोधात सहकार संस्था विभागीय सहनिबंधक औरंगाबाद यांच्या कडे तक्रार केली होती.त्या प्रकरणात सर्व कागदपत्रे पडताळणी केली असता विद्यमान संचालक बालाजी देसाई यांनी सहकार कायद्याचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी देसाई यांचे बॅंक संचालक पद अपात्र केले असून पुढील पंचवार्षिक काळ होईपर्यंत त्यांना कोणत्याही नियमाखाली पून्हा संचालक पदावर विराजमान होता येणार नाही.असा आदेश निकाल देण्यात आला आहे. यामुळे पूर्णा तालुक्यातील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या