🌟परभणी जिल्ह्यातील सोनपेठ घटनेतील मृत सफाई कामगारांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत....!


🌟राज्याचे जनहीतवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटने बद्दल शोक व्यक्त केला आर्थिक मदतीची केली घोषणा🌟 


मुंबई (दि.१२ मे २०२३) : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरानजीक भाऊचा तांडा येथे काल सेप्टिक टॅंकमधील मैला स्वच्छ करतांना पाच जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या वारसांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या यासंदर्भातील योजनेतून प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेतील जखमी झालेल्या कामगारावर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार शासनाच्या खर्चातून करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

काल रात्री ९ च्या सुमारास भाऊचा तांडा येथील शेत वस्तीवरील एका घरातील सेप्टिक टॅंक मधील मैला सफाई करताना पाच जणांचा  गुदमरून मृत्यू झाला होता.  एका कामगारास गंभीर अवस्थेमध्ये अंबजोगाई  येथील शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.  मुख्यमंत्र्यांनी या घटनेची माहिती होताच त्वरित आवश्यक ती मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या