🌟पुर्णा नगर परिषदे अंतर्गत शहरात सुरु असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या विकासकामांच्या गुणवत्तेवर अखेर प्रश्न चिन्ह ?


🌟रिबाउंड हॅमर मशीन चाचणी अनुसार गुणनियंत्रण अहवालात विकासकामे निघाली निकृष्ट दर्जाची🌟


पुर्णा (विशेष वृत्त) - पुर्णा नगर परिषदे अंतर्गत शहरातील जवळपास आठ प्रभागांमध्ये जिल्हा नियोजन समिती/जिल्हा वार्षिक योजनेसह राज्य सरकार/केंद्र सरकारसह विविध विधान परिषद/राज्यसभा सदस्यांच्या विशेष फंडातून देखील करोडो रुपयांची निकृष्ट/बोगस सिमेंट रस्ते/सिमेंट नाल्यांसह डांबर रस्ते तसेचगार्डन (उद्यान) आदी कामे युध्द पातळीवर रात्रंदिवस चालत असून या कामांची गुणवत्ता अत्यंत खालावली असल्यामुळे सदरील कामांची चौकशी करण्यात यावी यासंबंधी शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते पक्ष पदाधिकारी यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतर देखील नगर परिषदेचे प्रभारी मीख्याधिकारी संतोष लोमटे,नियमबाह्य प्रभारी नगर अभियंता (संगणक अभियंता) सिध्दार्थ गायकवाड,ओएस बाबर यांच्या कृपा आशिर्वादाने 'तुम्ही करा वटवट आम्ही भ्रष्टाचारी आहोत निबरगट्ट' अश्या पध्दतीने निकृष्ट बोगस कामांचा सपाटाच सुरु असल्याचे दिसत आहे.


पुर्णा नगर परिषदे अंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक ०१ प्रभाग क्रमांक ०२,प्रभाग क्रमांक ०४,प्रभाग क्रमांक ०५,प्रभाग क्रमांक ०६,प्रभाग क्रमांक ०७,प्रभाग क्रमांक ०९ प्रभाग क्रमांक १० या प्रभागांमध्ये निकृष्ट/बोगस विकासकामांची जणूकाही मालिकाच सुरु असल्याचे निदर्शनास येत असून या निकृष्ट/बोगस विकासकामांच्या अनेक तक्रारींमधून असे निदर्शनास येते की या निकृष्ट/बोगस विकासकामांच्या मिलिकेचे सुत्रधार तत्कालीन पुर्व मुख्याधिकारी अजय नरळे,नियमबाह्य पध्दतीने नियुक्त केलेले प्रभारी नगर अभियंता सिध्दार्थ गायकवाड (संगणक अभियंता),सब ओव्हर अर्थात सहाय्यक अभियंता संजय दिपके यांनी शहरातील विकासाची संपूर्णतः वाट लावणाऱ्या भ्रष्टाचारी गुत्तेदार/खंड गुत्त्यातील राजकारण्यांशी हात मिळवणी करीत करोडो रुपयांच्या विकासनिधीची धुळधान केल्याचे निदर्शनास येत असून शहरात सुरू असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या विकासकामां संदर्भात संबंधित कामांचे पडद्यामागील छुपे गुत्तेदार आणि कागदावरील गुत्तेदार यांनी या कामांचा थडपार्टी गुणनीयंत्र अहवाल नांदेड येथील शासकीय तंत्र निकेतण स्थापत्य अभियांत्रिकीचे कर्तव्यदक्ष सिनियर प्राध्यापक श्री.लक्ष्मण जाधव यांच्याकडून मागवला होता त्यांनी प्रत्यक्ष कामांची पाहणी करीत रिबाउंड हॅमर मशीनने चाचणी केली असता शहरातील प्रभाग क्रमांक ०८ येथील काम वगळता शहरातील क्रमांक ०१ प्रभाग क्रमांक ०२,प्रभाग क्रमांक ०४,प्रभाग क्रमांक ०५,प्रभाग क्रमांक ०६,प्रभाग क्रमांक ०७,प्रभाग क्रमांक ०९ प्रभाग क्रमांक १० या प्रभागां संबंधित कामे दर्जाहीन असल्याचे निदर्शनास आले असल्याने त्यांनी या सर्व कामांचा अहवाल भेटाळला असल्याचे समजते त्यामुळे शहरातील संबंधित आठ प्रभागांमधील विकासकामे निकृष्ट व दर्जाहीन असल्याचे उघड झाल्यामुळे जिल्हा नगर प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या