🌟पुर्णेतील स्वा.सै.सुर्यभानजी पवार महाविद्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा....!


🌟यावेळी प्राचार्य विद्यालयाचे डॉ. रामेश्वर पवार यांनी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले🌟


पूर्णा (दि.०१ मे २०२३) प्रतिनिधी - येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी  कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांनी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.  महाविद्यालयात सामुदायिक राष्ट्रगीताने राष्ट्रीय ध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी संगीत विभागाच्या प्रा. सुजाता घन यांनी महाराष्ट्र गीत गायले. महाराष्ट्र आपल्या मार्गदर्शनात महाराष्ट्र दिनाचे महत्त्व सांगून  महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.  राष्ट्रीय ध्वजास मानवंदना देतांना संचलन क्रीडा संचालक डॉ भारत चापके यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक प्रा.डॉ प्रकाश सूर्यवंशी यांनी केले.आभार प्रा.डॉ.संजय कसाब यांनी मानले.  याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या