🌟महाराष्ट्रात गाजलेल्या संकेत कुलकर्णी हत्या प्रकरणातील आरोपीला ठोठावली जन्मठेपेची शिक्षा....!


🌟या घटनेतील अन्य तिन जनांची निर्दोष मुक्तता : न्यायालयाचा निर्णय🌟 

परभणी (दि.३१ मे २०२३) : पाथरी येथील संकेत संजय कुलकर्णी या महाविद्यालयीन विद्यार्थाचा छत्रपती संभाजी नगर (औ.बाद) येथे मागील पाच वर्षापुर्वी दि.२३ मार्च २०१८ रोजी भर दिवसा चारचाकी गाडीखाली चिरडून निर्घृण हत्या करण्यात आली होती या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संकेत जायभाये याला छत्रपती संभाजी नगर (औ.बाद) च्या न्यायालयाने आज बुधवार दि.३१ मे २०२३ रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तर इतर तिन संशयीत आरोपींना निर्दोष मुक्त केले.


           छत्रपती संभाजी नगर (औ.बाद) येथील सिडको एन-२ येथील कामगार चौकालगतच्या परिसरात २३ मार्च २०१८ रोजी दिवसा ढवळ्या पाथरीच्या संकेत संजय कुलकर्णी या महाविद्यालयीन युवकाची मित्रांनीच कारखाली चिरडून निर्घृन हत्या केली. यातील मुख्य आरोपी संकेत जायभाये याने आपल्या मित्राच्या म्हणजेच संकेत कुलकर्णी याच्या अंगावरुन चार-सहा वेळा कार घातली. तेथून हे मित्र फरार झाले. परंतु, दिवसा ढवळ्या घडलेल्या या क्रुर प्रकाराने  छत्रपती संभाजी नगरासह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली. ठिकठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ मोठे मोर्चेही निघाले. मुकुंदवाडी पोलिसांनी या खळबळजनक घटनेतील गांभीर्य ओळखून जलदगतीने तपास सुरु केला. त्यातून मुख्य आरोपी संकेत जायभाये व संकेत मचे, उमर पटेल आणि विजय जोग यांना मोठ्या शिताफीने अटक करुन त्यांच्या विरोधात न्यायालयात खटला उभा केला. तर राज्य सरकारने या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली. छत्रपती संभाजी नगरच्या न्यायालयात या प्रकरणात खटला उभा राहीला तेव्हा निकम यांनी सरकार पक्षातर्फे भक्कम अशी बाजू मांडली. न्यायमूर्ती डी.एच. केळूसकर यांनी सूनावनी पूर्ण झाल्यानंतर व २२ साक्षीदार तपासल्यानंतर या घटनेचा आज बुधवारी निकाल जाहीर केला.

           दरम्यान,अ‍ॅड.निकम यांना जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे, अ‍ॅड.सिध्दार्थ वाघ यांनी सहाय्य केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या