🌟पुर्णेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिरात 150 रुग्णांची तपासणी....!


🌟रुरल डेव्हलपमेंट सोसायटी संचलित नवचेतना महाराष्ट्र एकल महिला राज्यस्तरीय संघटनेकडून शिबिराचे आयोजन🌟


पुर्णा (दि.०१ मे २०२३) : रुरल डेव्हलपमेंट सोसायटी संचलित नवचेतना महाराष्ट्र एकल महिला राज्यस्तरीय संघटन आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिरामध्ये पुर्णा शहरातील व परिसरातील 150 च्यावर रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषध उपचार केले व पुढील काळात आरोग्य बिघडले नाही पाहिजे म्हणून मार्गदर्शन केले.ज्या रुग्णां ऑपरेशन करायला हवे त्यांना कमीत कमी खर्चात करण्यात आले तसेच नवचेतना महाराष्ट्र हे संघटन एकल महिलांसाठी असे कार्यक्रम आयोजित करणार आहे त्यासोबतच महिलांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणार आहे या संघटनेने केवळ 50 रुपये वार्षिक सर्वसाधारण सभासदत्व फिस मध्ये वेगळे वेगळी उपक्रम राबविले जातात.


या आरोग्य शिबिरात डॉ. चौधरी एहसान अ रहेमान. डॉ अफरोज फातिमा. डॉ. माजिद खान डॉ. विनय बगाटे डॉ. संदीप जोंधळे डाँ बालचंद थोरात,व अक्षय मोरे, निर्मिती क्लिनिक लॅबरोटी पूर्णा, यांनी रुग्णांच्या तपासणी केली. शिबिरास पूज्य भन्ते पंयावंश, अध्यक्ष सार्वजनिक भीम व बुद्ध जयंती, हे होते , अँड. हर्षवर्धन गायकवाड न प सदस्य पूर्णा, डॉ. प्रदीप कापसे प्राचार्य राम धबाले, विजय बगाटे पत्रकार, अमजद पिंपळेकर, सुशीलकुमार दळवी, श्रीकांत हुरणे , प्रशांत भालेराव, गौतम भोळे, संतोष गायकवाड, शाहीर गौतम कांबळे यांनी भेट दिली, यशस्वीतेसाठी सार्वजनिक भीम बुद्ध जयंती मंडळ उपाध्यक्ष राहुल धबाले, इंजि. विजय खंडागळे, विशाल कांबळे आधिराज्य प्रतिष्ठान दिलीप गायकवाड, मंडळाचे पदाधिकारी सुरज जोंधळे, विशेष सहकार्य, नितीन सोनुले, राहुल हनवते, एँड. सिद्धांत गायकवाड, अविनाश नटराज कांबळे, सोनू काळे, गौतम सोनुले, किरण जोगदंड, विठ्ठल कांबळे संविधान, संदीप थोरात, कांबळे धनंजय गवळी, सचिन पाईकराव, राजू जोंधळे सुमेध काळे नितीन धुळे ,शेख मुजीब न्यू महाराष्ट्र मेडिकल, शशांक पौळ, सुभद्रा ऑप्टिकल्स मेडिकल्स स्टोअर्स यांनी विनामूल्य औषधी वाटप करण्यात आली,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि. पी .जी रणवीर यांनी केले.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या