🌟देशोन्नतीचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे यांची कन्या प्रार्थना 12 वीच्या परीक्षेत 73 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण...!


🌟प्रार्थनाने कुठलीही टिवशन न लावता व शाळेतील उन्हाळी वर्ग न अटेंड करता हे गुण मिळवले🌟 

मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष तथा दैशोन्नतीचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी असलेले राजेंद्रजी काळे यांची नंबर दोनची मुलगी प्रार्थना यंदा 12 वीला होती व काल 12 वीच्या लागलेल्या निकालात प्रार्थना 73 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली.प्रार्थनाने कुठलीही टिवशन न लावता व शाळेतील उन्हाळी वर्ग न अटेंड करता हे गुण मिळवले  त्यामुळे  प्रार्थनाने मिळवले 73 टक्के हे  निश्चितच नैत्रदिपक असेच आहे असे निश्चितच म्हणावे लागेल.हे तिचे खरे खरे मिळविलेले गुण आहेत.त्यामुळे प्रार्थना निश्चितच अभिनंदनास पात्र आहे. गेल्या 25 वर्षांपासून  दैनिक दैशोन्नतीमध्ये नाॅनस्टाप,अखंड व अविरतपणे   राजकीय, सामाजिक ,  आर्थिक, धार्मिक, समाजकारण , आदी विविध विषयांवर लिहणाऱ्या व वेळ प्रसंगी प्रासंगिक लिहणाऱ्या राजेंद्र काळे यांनी  आपली मुलगी 12 वीला होती व तीच्या 12वीच्या निकालाचे औचित्य साधून प्रासंगिक असे अतिशय सुंदर लिखाण केले आहे. राजेंद्र काळे हे माता सरस्वती देवीचा वरदहस्त असलेले व शब्दाप्रभु ओळखले जाणारे सिद्धहस्त पत्रकार असल्याने नेहमीप्रमाणे राजेंद्र काळे हे  यांचे हे लिखाण अतिशय  सुंदर व  मार्मिक भाषेत लिहले  आहे त्यांचे हे लिखाण असे हृद्यस्पर्शी व मन हेलावून टाकणारे आहे .राजेंद्र काळे यांनी प्रार्थनाच्या जन्माला यायच्या अगोदर पासून जी कहाणी सांगितली ति खरोखरच हदय / मन हेलावून टाकणारी अशी आहे.कारण त्या काळात खरोखरच मुलगी नको असेच म्हटले जायचे व त्यातही दुसरी मुलगी तर बिलकुल नको म्हटले जायचे त्यामुळे  महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात स्त्रीभ्रूणहत्या सर्रास हेतू होत्या त्यामुळे राजेंद्र काळे यांना जेव्हा गर्भात पुन्हा मुलगी असताना कळुनही  त्यांनी व वहिनींनी मुलगाच हवा असा हट्हास न करता या गर्भाला म्हणजे प्रार्थनाला जन्म द्यायचा निर्णय घेतला होता यावरून राजेंद्र काळे व वहिनींचे मन किती मोठे आहे हे लक्षात येते .*

राजेंद्रजी काळे यांनी आपली मुलगी प्रार्थनाच्या 12 वीच्या निकालावर लेख लिहितांना गौतम बुद्धांच्या जन्मांची जी कहाणी, गोष्ट,कथा सांगितली आहे ती अतिशय मन हेलावून टाकणारी अशी आहे. या कथेमध्ये त्यांनी जे शेवटी म्हटले आहे की राजपुत्र सिद्धार्थ चक्रवर्ती सम्राट बनला असता तर कालबाह्य झाला असता, परंतु राजपुत्र सिद्धार्थ हा शेवटी सर्व जगाचा उद्धार करणारे व जगाला शांततेचा संदेश देणारे गौतम बुद्ध बनले त्यामुळे त्यामुळे त्यांचे नाव चिरंतन आहे म्हणजे गौतम बुद्ध यांचे नाव हजारो वर्षांपासून चालत आलेले आहे व पुढेही हजारो वर्षे चालणारे आहे हे जे म्हटले आहे ते अतिशय योग्य व अगदी 💯/ 100 टक्के खरे आहे. या कथेमध्ये सांगितल्या प्रमाणे प्रमाणे प्रार्थना 12 वीच्या परिक्षेमध्ये 95 किंवा 96 टक्के गुण घेऊन फार फार तर डॉक्टर किंवा इंजिनिअर झाली असती परंतु काळाच्या पडद्याआड प्रार्थनाच्या नशीबात यापेक्षा काही चांगले लिहिले असेल व प्रार्थना देखील आपले वडील*

*शब्दप्रभु ओळखले जाणारे* *वृत्तदर्पणकार*

मा.राजेंद्रजी काळे यांच्या प्रमाणेच आपले स्वतःचे नाव ती ज्या क्षेत्रामध्ये जाईल किंवा जेथे कुठे काम करेल तेथे आपले स्वतःचे नाव तळपद ठेवेल म्हणजे राजेंद्रजी काळे यांच्या प्रमाणेच स्वतःचे नाव रोशनच करेल म्हणजे स्वतः चे नाव गाजवेल यात काहीच शंका नाही कारण प्रार्थनावर  मा. राजेंद्रजी काळे व वहिनीचे तसे संस्कार आहेत. प्रार्थनाला 12 वी मध्ये जे यश मिळाले त्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन व प्रार्थनाला पुढील शैक्षणिक व भावी उर्वरित आयुष्यसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा....💐💐💐💐

💥शुभेच्छुक : पत्रकार मोहन चौकेकर मराठी पत्रकार परिषद बुलढाणा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या