🌟राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल 11 किंवा 12 तारखेला लागण्याची शक्यता....!


🌟कायदेतज्ज्ञांच्या नजरेतून नेमके काय आहे निकालाची शक्यता ? वाचा सविस्तर🌟

✍️ मोहन चौकेकर

राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल येत्या तीन ते चार दिवसांत लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांचीही धाकधूक वाढली आहे. निकालावर अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.तर अनेक शक्यता वर्तविण्यात येत आहेत.*

राज्यात जून २०२२ मध्ये सत्तांतर झाले आहे. शिवसेनेतून शिंदे गटाने बंड करत भाजपासोबत सरकार स्थापन केले आहे. त्यानंतर शिंदे गट व ठाकरे गट अनेकवेळा आमनेसामने आले आहेत. दरम्यान, एकिकडे शिवसेना नाव व धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिले आहे. तर दुसरीकडे राज्यातील सत्तासंघर्षाची लढाई न्यायालयात प्रलंबित आहे. सोळा आमदार अपात्र यावर राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल येत्या तीन ते चार दिवसांत लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांचीही धाकधूक वाढली आहे. निकालावर अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. तर अनेक शक्यता वर्तविण्यात येत आहेत. मात्र कायदेतज्ज्ञांच्या नजरेतून काय आहे निकालाची शक्यता.ते वाचा.

* काय आहे शक्यता ? :-

1. आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणे ही एक मोठी शक्यता सोप्या निर्णयाचा भाग म्हणून जास्त आहे.*

2. गव्हर्नर भगतसिंग कौशारी यांनी जो आदेश काढून फ्लूअर टेस्ट घ्या, विधानसभेत बहुमत सिद्ध करा असा आदेश काढला तो काढण्याचा त्यांना अधिकारच नव्हता. राज्यपालांनी बहुमतचाचणीचा दिलेला आदेश रद्द ठरवला जाऊ शकतो.*

3. पक्षविरोधी कारवाया केल्या असे म्हणून 16 आमदारांना थेट स्वतःच अपात्र ठरविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घटनेतील कलम 142 चा वापर करून घेईल कारण बहुमत चाचणी आदेश ही राज्यपालांची कृतीच घटनाबाह्य असल्याने ती रद्द करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहेत.*

4. एक धूसर व कदाचित अस्पष्ट शक्यता आहे की हे प्रकरण मोठ्या संविधानिक गुंतागुंतीचे आहे व त्यामुळे 10 व्या परिशिष्टा संदर्भात आधी झालेल्या निर्णयांचा संदर्भ घेऊन हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवले जाऊ शकते. ही शक्यता धूसर आहे व तसे होणार नाही असे वाटते.

दरम्यान, आमदार अपात्रतेचा निर्णय विद्यमान विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला गेला, तर मात्र पुढील निवडणुकीपर्यंत सध्याची स्थिती कायम ठेवणे शिंदे-फडणवीस सरकारला शक्य होणार आहे. घटनापीठाने शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरविल्यास मुख्यमंत्र्यांना तातडीने राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर नव्याने सरकार स्थापन करण्याचे सर्व सोपस्कार पार पाडावे लागतील. राज्यघटनेच्या दहाव्या परिशिष्टातील तरतुदीनुसार दोनतृतीयांशहून अधिक आमदारांचा गट फुटल्यास त्यांना अन्य पक्षात विलीन होण्याचे बंधन आहे. शिंदे गट कोणत्याही पक्षात विलीन झालेला नाही, तर आपलाच गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा न्यायालयात केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तोच मूळ पक्ष असल्याचे मान्य करून धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हही बहाल केले. ठाकरे गटाने बंडखोर आमदारांवर बजावलेल्या अपात्रतेच्या याचिकांचे भवितव्य न्यायालय ठरविणार की विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणीसाठी पाठविले जाणार, हा मुद्दा कायदेशीर व राजकीय दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे.

* निकाल या दोन तीन दिवसात लागण्याची शक्यत :-

दरम्यान, या महिन्यात निकाल येण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल 11 किंवा 12 तारखेला लागण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला आहे. न्यायमूर्ती एम. आर. शाह हे १५ मे रोजी निवृत्त होत असून तत्पूर्वी म्हणजे बुधवार ते शुक्रवार या दरम्यान घटनापीठ निकाल देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

* घटनापीठ म्हणजे काय ?

*विशिष्ट विषयावर नेमका अर्थ काय आहे हे सांगण्याचं काम घटनापीठ करते*

*घटनात्मक बाबींमध्ये कायद्याचा अर्थ लावावा लागतो*

*कायद्याच्या मुलभूत प्रश्नांचा अर्थ लावण्यासाठी अधिक न्यायाधीशांची गरज भासते*

*अशा प्रकरणातील सुनावणी घटनापीठाकडे जाते.*

*तेव्हा सुनावणी ५ किंवा त्यापेक्षा जास्त न्यायाधीशांद्वारे केली जाते.*

*एखाद्या मुद्द्यावरील घटनापीठाचा निर्णय हा ३०-४० वर्षांसाठी कायदा म्हणून बनतो*

*पाच किंवा त्याहून अधिकचे न्यायाधीशांच्या पीठाला घटनापीठ म्हणतात*

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या