🌟वनविभागकडून यावर्षी 1 लाख 26 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट...!


🌟वृक्ष लागवडीसाठी खड्ड्यांचे खोदकाम सुरू झाले असल्याचे तालुका वनक्षेत्र अधिकारी ए.यु.चिकटे यांनी दिली🌟

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- वनविभागाने यावर्षी 1 लाख 26 हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्टे ठेवण्यात आले. उद्दीष्ट्यपुर्तीसाठी तयारी करण्यात आली आहे आणि खड्ड्यांचे खोदकाम सुरू झाले असल्याचे तालुका वनक्षेत्र अधिकारी ए. यु. चिकटे यांनी दिली. 

        वनविभागाने परिसरात मोठय़ा प्रमाणावर वृक्ष लागवड केली आहे. गतवर्षी वनक्षेत्रात कुठेही आग लागल्याचा प्रकार घडलेला नाही. त्यामुळे वनक्षेत्राचे कोणतेही नुकसान झाले नाही. आगामी काळात 1 लाख 26 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे. थर्मल परिसरातील रोपवाटिका येथे 1 लाख  विविध प्रकारची रोपे आहेत. तर वसतंनगर येथे  81 हजार 200 रोपाची लागवड झालेली आहे. रेवली येथे 30 हजार रोपे असुन दौनापुर येथे 44 हजार 800 रोपाची लागवड करण्यात येणार आहे. 

       परळी वैजनाथ तालुक्यात 60 हजार हेक्टरवर वनक्षेत्र आहे. या सर्व क्षेत्रावर भरगच्च वनिकरण करण्याचा संकल्प आहे. या परिसरात सध्या खड्डेचे खोदकाम करून भरण्यात आले असल्याची माहिती तालुका वनपरीक्षेत्र अधिकारी ए.यु.चिकटे,वनरक्षक बी.जे. नागरगोजे, पी. जे. तागड यांनी दिली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या