🌟पुर्णेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन...!


🌟ह्या विविध स्पर्धा ७ एप्रिल ते ११ एप्रिल या दरम्यान घेण्यात येणार आहे🌟

पुर्णा ( दि.०१ एप्रिल ) - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळ २०२३ पूर्णा  यांच्या वतीने विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून ह्या विविध स्पर्धा ७ एप्रिल ते ११ एप्रिल या दरम्यान घेण्यात येणार आहे. 


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध सार्वजनिक जयंतीचे  औचित्य साधून भव्य असे विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय आणि तृतीय असे पारितोषिक ठेवण्यात आले आहे ह्या विविध स्पर्धा ७ एप्रिल ते ११ एप्रिल दरम्यान घेण्यात येणार असून दि. ७ एप्रिल शुक्रवार रोजी १८ तास अभ्यास उपक्रम वेळ सकाळी ०६ ते रात्री १२ वाजता पर्यंत  बुद्ध विहार पूर्णा येथे घेण्यात येणार आहे तसेच शनिवार ८ एप्रिल रोजी निबंध स्पर्धा दुपारी १ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार या विषयावर बुद्ध विहार पूर्णा येथे घेण्यात येणार असून याची वयोगट मर्यादा १५ ते २५ असे राहिल तर रविवार ९ एप्रिल रोजी वकृत्व स्पर्धा सायंकाळी ५ वाजता फुले, शाहू, आंबेडकर, यांचे विचार काळाची गरज या विषयावर घेण्यात येईल या स्पर्धेची वयोमर्यादा १२ ते २५ अशी असून ही स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह डॉ.आंबेडकर नगर पूर्णा येथे आयोजित केली आहे तर १० एप्रिल रोजी स. ११ वाजता रांगोळी स्पर्धेचे आयोजन सुभेदार रामजी आंबेडकर सभागृह,नालंदा नगर, पूर्णा येथे तर ११ एप्रिल रोजी सायं ६ वाजता गीत गायन स्पर्धा वयोमर्यादा १५ ते ३० वर्ष असून हि स्पर्धा शांतीनगर पूर्णा येथे होणार आहे या सर्व स्पर्धेसाठी नाव नोंदणी अनिवार्य असून यासाठी भन्ते संघरत्न मो.९५१८९९५३७३, अतुल गवळी, मो.९८९०६७८२८९,सुरज जोंधळे मो. ७७४३९३२०४२ यांच्याशी संपर्क साधावा व या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या