🌟थायलंड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांंच्या पंचधातू पुतळ्याच्या निर्माण सोहळ्यासाठी हत्तीअंबीरे यांना निमंत्रण...!


🌟भारतीय धम्मदुत म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसुचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांना निमंत्रण🌟

परभणी (दि.04 एप्रिल) : थायलंड देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांंच्या पंचधातू पुतळ्याचा निर्माण सोहळा दि.10 एप्रिल 2023 रोजी दुपारी 04-00 वाजता आयोजित करण्यात आला असून या सोहळ्याला भारतीय धम्मदुत म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसुचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

           डॉ. हत्तीअंबीरे यांनी भारत देशात पहिल्यांदाच थायलंड येथील 110 बौध्द भिक्खुंचा सहभाग असलेली परभणी ते चैत्यभूमी (दादर) अशी 570 किलोमीटरची भव्य बौध्द धम्म पदयात्रा यशस्वी केली. बुध्द विहाराचे विकास काम, धम्म परिषदा इत्यादी धार्मिक कार्यात त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. त्यांच्या या धम्म कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून थायलंड येथील चितांतावन आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्राचे संचालक भदंत प्रा. वजीरोडोम आणि व्ही. वजीरमेथी यांनी डॉ. हत्तीअंबीरे यांना सोहळ्याला निमंत्रित केले आहे.

दरम्यान, अखिल भारतीय भिक्खु संघ महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, धम्म पदयात्रा कोअर कमिटीचे डॉ. प्रकाश डाके, डॉ.बी.टी. धुतमल, भीमराव शिंगाडे, भगवान जगताप, प्रा.डॉ. संजय जाधव, राजेश रणखांबे, पंकज खेडकर, प्रा.डॉ. सुनील तुरुकमाने, मंचक खंदारे, अमोल धाडवे आदी पदाधिकार्‍यांनीनी त्यांचे अभिनंदन केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या