🌟पुर्णा-नांदेड राज्य महामार्गालगच्या चुडावा-कावलगाव रोड वरील निझाम कालीन पुल दुरुस्तीचे काम निकृष्ट....!


🌟चुडावा येथील जागृक नागरिक धनंजय देसाई यांनी अधिकाऱ्यांसह गुत्तेदारालाही धरले धारेवर🌟 


🌟निकृष्ट कामाची सखोल चौकशी करून गुत्तेदाराचा परवाना (लायसंन्स) रद्द करण्याची केली मागणी🌟

पुर्णा (दि.१४ एप्रिल) - पुर्णा-नांदेड राज्यमहामार्गालगत असलेल्या चुडावा-कावलगाव मार्गावरील चुडावा गावाजवळील ३३ के.व्ही. च्या बाजूलाच असलेल्या निझाम कालीन पुलाच्या दुरुस्तीसह संरक्षण कठडे व सिमेंट काँक्रिट बेडचे काम मागील दोन महिन्यापासून चालत असून सदरील काम अत्यंत बोगस व निकृष्ट दर्जाचे केले जात आहे सदरील कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यामुळे संबंधित गुत्तेदार व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे हितसंबंध असल्याचे उघड होत आहे.  


चुडावा-कावलगाव रोड वरील या निझाम कालीन पुलाच्या दुरुस्तीसह संरक्षण कठडे व सिमेंट काँक्रिट बेडचे काम निकृष्ट व दर्जाहीन होत असल्या संदर्भात चुडावा येथील जागृक नागरिक धनंजय देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने मागील एक महिन्या पूर्वी माहितीचा अधिकार देऊन कामा विषयी माहिती मागीतली होती परंतु सार्वजनिक बांधकाम विभागातील सबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना माहिती देणे तर सोडाच या कामाचा दर्जा सुधारन्याचा देखील प्रयत्न केला नाही त्यामुळे त्या माहिती अधिकाराच्या शासकीय कागदाला काही किंमत आहे की नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

संबंधित पुलासह रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट व बोगस पद्धतीने केले जात असून सदरील निकृष्ट कामाची परिस्थिती अधिकाऱ्यांना दाखवून सुद्धा त्या कामाच्या गुत्तेदारावर कुठलीही कार्यवाही केली जात नसल्यामुळे शंकेची पाल चुकचुकतांना दिसत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुनील मोरलवार यांना वारंवार भ्रमनध्वनी संपूर्ण साधून निकृष्ट कामाची पाहणी करण्याची विनंती करून देखील त्यांनी कामाची चौकशी केली नाही उलट त्यांनीच जागृक नागरिक देसाई यांना दम देण्याचा प्रयत्न केल्याचे समजते सदरील काम अंदाजपत्रकानुसार दर्जेदार व्हावे याकरिता देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री.राठोड यांना कामावर प्रत्यक्षात आणून काम दाखवले तरी पण अजून पर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झाली तर नाहीच याही पेक्षा दुर्दैवी बाब म्हणजे देसाई यांना कामा संदर्भात काहीच माहिती देण्यात आली नाही त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील बेजवाबदार व भ्रष्ट अधिकारी संबंधित भ्रष्ट गुत्तेदाराला सोईस्कररित्या पाठीशी घालून शासकीय विकासनिधी उधळत असल्याचे दिसत आहे.

 सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी या निकृष्ट व दर्जाहीन कामाची चौकशी सुरू करावी व दोषी आढळल्यास संबंधित गुत्तेदार (कॉन्ट्रॅक्टर) यांचा परवान (लायसन्स) तात्काळ रद्द करावे व शासनाची फसवणूक केल्या बद्दल संबंधितांवर सरसकट कायदेशीर गुन्हे दाखल करावे अशी मागणी होत आहे.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या