🌟परभणी येथे मंगळवार दि.०२ मे रोजी जिल्हा लोकशाही दिन.....!


🌟महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे सोमवार ऐवजी मंगळवार दि.०२ मे रोजी लोकशाही दिन🌟

परभणी (दि.२६ एप्रिल) - येत्या मे महिन्यात पहिल्या सोमवारी महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे मंगळवार दि.०२ मे रोजी दुपारी ०१-०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) श्रीमती स्वाती दाभाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे जिल्हा मुख्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी (पहिल्या सोमवारी सुट्टी असल्यास मंगळवारी) लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तसेच प्रत्येक तहसील कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी (तिसऱ्या सोमवारी सुटी असल्यास मंगळवारी) लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.  

     लोकशाही दिनामध्ये अर्ज किंवा तक्रारी करावयाच्या आहेत, अशा तक्रारदारांनी  किमान १५ दिवस आधी विहीत प्रपत्र, नमुन्यात सादर करावेत. विहीत मुदती व नमुन्यात अर्ज सादर केला नसल्यास अशा अर्जांचा विचार लोकशाही दिनात करण्यात येणार नाही. तक्रारकर्त्यांनी आपला अर्ज प्रथम तालुकास्तरीय लोकशाही दिनात सादर करावा आणि तक्रारदाराच्या अर्जाचे विहीत मुदतीत निराकरण न झाल्यास योग्य त्या कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही दिनासाठी विहीत मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) श्रीमती दाभाडे यांनी केले आहे.   

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या