🌟पुर्णेतील श्री.गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी....!


🌟प्रा.गोविंद कदम यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले🌟

 पूर्णा (14 एप्रिल 2023) - येथील श्री गुरू बुद्धिस्वामी  महाविद्यालयात भारतरत्न,शिक्षण तज्ञ,घटना तज्ञ,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. श्री गुरू बुद्धिस्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे सहसचिव तथा विद्यापीठाचे एम माजी अधिसभा सदस्य प्राध्यापक गोविंद कदम  यांच्या हस्ते  प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. के. राजकुमार, उपप्राचार्य डॉ. संजय दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे सदरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  कार्यक्रमाधिकारी डॉ. पुष्पा गंगासागर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या जीवन कार्याविषयी उपस्थितांना माहिती दिली. डॉ.ओंकार चिंचोले यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी डॉ बालासाहेब मुसळे, पर्यवेक्षक उमाकांत मिटकरी, श्री बाळासाहेब कुलकर्णी, प्रा बी पी शिंदे, श्री अशोक कदम, श्री वसंत कदम, श्री मंचक वळसे, श्री कालिदास वैद्य, दत्ता जाधव तसेच शिक्षक  व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या