🌟पुर्णा पोलिसांची निवासस्थान झाली उध्वस्त : मागील अनेक वर्षांपासून निवासस्थांन बांधण्याची मागणी ? प्रशासन निद्रिस्त...!


🌟निवास्थाना अभावी कर्मचाऱ्यांवर 'कुणी घर देत का रे घर ? वर्दीतल्या तुफानाला कुणी घर देत का रे घर' म्हणायची वेळ🌟  


✍🏻वृत्त विशेष :- चौधरी दिनेश (रणजीत)

पुर्णा (वृत्त विशेष) - कायदा व सुव्यवस्था अभादीत राहावी या करीता स्वतःच्या जिवासह स्वतःच्या कुटुंबाची पर्वा नकरता जनसामान्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी अहोरात्र राबराब राबणारे पोलिस अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रती प्रशासन किती निष्काळजी व निष्क्रिय आहे याचे जिवंत उदाहरण म्हणजे पुर्णा शहरातील पोलिस वसाहतीतील पोलिस अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या झालेल्या पडझडीच्या दुरावस्थेवरून निदर्शनास येते.


परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुर्णा शहरासह तालुक्यातील सुरक्षा व्यवस्थेची जवाबदारी सांभाळणाऱ्या पुर्णा पोलिस स्थानकात पो.नि.सुभाषचंद्र मारकड,सपोनि.श्री.घाटे,सपोनि.श्री.कांबळे, सपोनि.श्री.गायकवाड,सहा.पोलिस उपनिरिक्षक श्री.पोपलवार,सहा.पोलिस उपनिरिक्षक श्रीमती नायला मेडम,सहा.पोलिस उपनिरिक्षक,शकुंडे मेडम यांच्यासह इतर खात्याचे चार अधिकारी यांच्यासह अंदाजे ७० ते ७५ कर्मचारी असून यात अंदाजे १० महिला पोलिस कर्मचारी आहेत पोलिस वसाहतीतील सर्वच निवासस्थानांची पडझड झाल्यामुळे संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या राहण्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे या अधिकारी/कर्मचाऱ्यांना दिवसभर कर्तव्य बजावल्यानंतर नाईलाजास्तव आपल्या गावांकडे जावे लागते.जनसामान्यांसह त्यांच्या कुटुंबांची त्यांच्या मालमत्तेसह शासकीय मालमत्तेच्या सुरक्षेसह शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र डोळ्यात तेल ओतून कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांअभावी होत असलेल्या अव्हेलनेची सर्वसामान्यांसह शासनाला देखील जाणीव नसावी यापेक्षा ते दुर्दैव कोणते ? मागील अनेक वर्षापासून पुर्णेतील पोलिस वसाहतीचा प्रश्न गंभीर स्वरुप धारण करीत असतांना या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याचा प्रयत्न प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडून देखील होत नसल्याचे पाहावयास मिळत आहे.....
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या