🌟पुर्णेत भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात संपन्न....!


🌟जैन बांधवांच्या वतीने महावीर जन्म कल्याणक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शोभायात्रेचे ही करण्यात आले होते आयोजन🌟


पूर्णा (दि.०४ एप्रिल) - पुर्णा शहरात आज मंगळवार दि.०४ एप्रिल २०२३ रोजी जैन बांधवांच्या वतीने भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते या शोभायात्रेत सकल जैन समाज बांधवांसह माता-भगिनी अबालवृध्दांसह सर्व धर्मिय बांधवांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला यावेळी समाजातील तरुणांनी पारंपारिक वेषभुषेत भव्य शोभायात्रेत सहभागी होत शोभायात्रेची शोभा वाढवली.


 पुर्णा शहरातील महावीर नगर परिसरातील श्रीक्षेत्र जैन मंदिर आज मंगळवार दि.०४ एप्रिल रोजी सकाळी ०८-०० वाजेच्या सुमारास भगवान महावीर यांच्या भव्य प्रतिमेची यावेळी जैन मंदिराचे विश्वस्त प्रमोद मुथा,किशोर लोढाया,पारसमल लोढा,शांतीलाल मुथा,प्रेमचंद उर्फ पप्पू मुथा,प्रफुल्ल खिवंसरा, प्रेमचंद खिवंसरा,दिपक मुथा,उत्तम मुथा, प्रफुल्ल संचेती यांच्यासह सकल समाज बांधवांच्या उपस्थितीत विधिवत पुजाअर्चा करुन जैन मंदिर परासरातून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली.


सदरील भव्य शोभायात्रा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,महर्षी दयानंद स्वामी चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतिर्थ,महात्मा बसवेश्वर चौकातून ढोल ताशांच्या गजरात अत्यंक धार्मिक वातावरणात धार्मिक ध्वज हातात घेऊन वाजत गाजत नाचत भगवान महावीर यांच्या जयघोषात पुन्हा भव्य शोभायात्रा श्रीक्षेत्र जैन मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर शोभायात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी समाजातील मान्यवरांसह शोभायात्रेतील सहभागी मान्यवरांच्या महापुजा करण्यात आली यावेळी जैन मंदिर स्थापनेत मोलाचा सहभाग नोंदवणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सकल जैन समाज बांधव व श्री.राजस्थानी युवा मंच या सामाजिक संघटनेच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला अश्या पध्दतीने जैन समुदायाच्या वतीने भगवान महावीर यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहपुर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

         या भव्य शोभायात्रेत शहरातील जेष्ठ आरोग्यतज्ञ सन्माननीय डॉ.द्वारकादासजी झंवर,शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख विशाल कदम,संतोष एकलारे,नितीन उर्फ बंटी कदम,शामराव कदम,ॲड.राजेश भालेराव,शिवप्रसाद सोनी,आनंद अजमेरा, डॉ. हरिभाऊ पाटील, मुंजाजी कदम, हनुमान अग्रवाल, विशाल चितलांगे, किरण कुलथे, डॉ.अजय ठाकूर, सुभाष ओझा यांच्यासह  मान्यवर उपस्थित होते. यावेळी संध्या गग्गड,विहार सेवक चंद्रकांत चापके, नवनाथ पारवे, दादाराव चापके, गोपाळ भुसारे आदींचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रमोद  मुथा यांनी केले आभार अमोल सोनटक्के यांनी मानले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.... 


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या