🌟परभणी महानगर पालिकेचा कौतुकास्पद निर्णय : मालमत्ता कराच्या रक्कमेत नागरिकांना देणार ०५ टक्के सूट.....!


🌟दरवर्षी मिळणार शहरातील नागरिकांना लाभ🌟

परभणी (दि.२८ एप्रिल) : महानगरपालिकेच्या वतीने नागरीकांना मालमत्ता कराच्या चालू मागणीच्या रक्कमेत ०५ टक्के सूट लागू करण्यात आली असून आता दरवर्षी नागरीकांना हा लाभ घेता येणार आहे.

            महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मालमत्ता कर मुख्य स्त्रोत आहे. नागरीकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे म्हणून महानगरपालिकेने ऑनलाईन मालमत्ता कर भरण्याची सुवीधा उपलब्ध करून दिलेली आहे. नागरीकांना  https://parbhanimc.org  या लिंकवर जाऊन आपला मालम कर Debit Card, Credit card, UPI, Net Banking , मागणी बिलावरील QR code ई. चा वापर करून भरता येणार आहे. या शिवाय महापालिकेच्या वसुली लिपीक किंवा प्रभाग समिती येथील कॅश काऊंन्टरवर सुद्धा नागरीकांना आपला मालमत्ता कर भरता येणार आहे. नागरीकांनी सदर सुटीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आवाहन आयुक्त तथा प्रशासक तृप्ती सांडभोर यांनी केले आहे.

            दरम्यान, जे नागरीक प्रामाणीकपणे, वेळेवर मालमत्ता कराचा भरणा करतात अशा नागरीकांकरीता प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम १४०-अ अन्वये प्रत्येक वित्तीय वर्षात जे मालमत्ताधारक दिनांक ०१ एप्रील ते ३० जुन या कालावधीत मालमत्ता कराचा संपूर्ण वर्षाकरीता आगाऊ भरणा करतील अशा मालमत्ताधारकांना मालमत्ता कराच्या चालु मागणीच्या रक्कमेत 5 टक्के  सुट लागू करण्यात आली असून यापुढे दरवर्षी हा लाभ नागरीकांना घेता येणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या