💥पूर्णा शहरात सर्वत्र कचऱ्यांची ढिगार नाल्याही तुंबल्या : घाणीच्या वाढत्या साम्राज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात...!


💥नगर परिषद प्रशासन प्रशासन कुंभकर्णी झोपेत : शहरात 'स्वच्छतेचे तिनतेरा,स्वच्छता विभाग नऊ दो ग्यारा' ?💥


पुर्णा (दि.०६ एप्रिल) - पुर्णा शहरात मागील अनेक महिन्यांपासून घंटागाड्या बंद असल्यामुळे शहरातील विविध प्रभागांसह मुख्य बाजारपेठ तसेच शहरातील सार्वजनिक मार्गांवर अक्षरशः केरकचरा/घाणींचे ढिगार लागल्याचे दिसत असून नगर परिषद स्वच्छता विभागा मार्फत शहरातील नाल्यांची नियमित स्वच्छता केल्या जात नसल्यामुळे नाल्या तुडुंब भरुन नाल्याचे घाण पाणी रस्त्यांवर वाहतांना दिसत आहे तर शहरातिल विविध नागरी वसाहतींमध्ये जागोजाग घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्या मुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवून नागरिकांना साथींच्या आजाराला देखीला सामोरे जावे लागत आहे.  

पूर्णा नगर परिषद प्रशासनासह स्वच्छता विभागाच्या मनमानी कारभारामुळे शहरातील विविध अशा प्रभागामध्ये कचराच्या व नाल्याच्या घाण पाणी चे साम्राज्य वाढत जात आहे नगर परिषद प्रशासनाच्या कर्मचाऱ्याकडून बऱ्याच महिन्यापासून विविध अशा प्रभागांमध्ये  स्वच्छता केली जात नसल्यामुळे नगरात गत अनेक दिवसांपासून सांडपाणी वाहून जाणा-या नाल्यात सुका ओला कचरा, गाळ व प्लास्टिकच्या वस्तू अडकून घाणपाण्यांनी भरल्या आहेत तर हेच नाल्याचे घाण पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे दृश्य नागरिकांना पहावयास मिळत आहे  व सध्या त्यातच पवित्र रमजान महिना चालु झाला असून मुस्लिम बांधवांना या घाणीमुळे मोठा सामना करावा

 लागत आहे शिवाय या घाणीमुळे रोगराई पसरुन नागरीकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते असे नाकारता येणार नाही या कामाकडे नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत असून नागरिकांनी  तक्रारी देऊन व तोंडी सांगून सुद्धा शहरातील नाल्या वेळेवर स्वच्छ केल्या जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे शहरातील नाल्या लवकरात लवकर स्वच्छ कराव्यात व स्वतः जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी या कडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या