🌟परभणीतील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित प्रभावती विद्यालयाचे अध्यक्ष इंजी.एस.एस.नांदापुरकर यांचे दुखद निधन...!


🌟शैक्षणिक क्षेत्रा सोबतच सामाजिक,प्रशासकिय व राजकिय क्षेत्रातही त्यांनी आपले कर्तृत्व प्रस्थापित केले होते🌟

परभणी : येथील स्वामी विवेकानंद  शिक्षण संस्था संचलित प्रभावती विद्यालयाचे अध्यक्ष इंजी.एस एस.नांदापुरकर यांचे वयाच्या 87 व्या वर्षी वृध्दपकाळाने दुखद निधन झाले. शैक्षणिक क्षेत्रा सोबतच सामाजिक,प्रशासकिय व राजकिय क्षेत्रातही त्यांनी आपले कर्तृत्व प्रस्थापित केले.

 महाराष्र्ट राज्य निवड मंडळ अध्यक्ष, जिल्हा मजुर फेडरेशन चेअरमन,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठ सदस्य,महात्मा फुले मागसवर्गीय आर्थिक विकास महामंडळ,मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ अजिवन सदस्य,नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्था संस्थापक सदस्य,माॅडल इंग्लिश शिक्षण संस्था संस्थापक कोषाध्यक्ष, प्रभावती सुतगिरणी संचालक,पिपल्स को. आॅपरेटिव्ह बँक संचालक,लाॅयन्स क्लब सदस्य या माध्यमातुन ते सातत्याने  कार्यप्रवण होते.

त्यांच्या निधना मुळे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.ऊद्या सकाळी 8 वाजता वैकुंठधाम स्मशानभुमी जिंतूर रोड येथे अंत्यविधी होणार आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या