🌟परभणी रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाचे कर्तव्यतत्पर जवान एम.जी.सुर्यवंशी यांच्या सतर्कतेमुळे वाचला प्रवास्याचा जिव....!


🌟धर्माबाद-मनमान मराठवाडा एक्सप्रेस मध्ये चढतांना हात निसटल्यामुळे गाडीखाली जात असतांना तात्काळ ओढले वर🌟


परभणी (दि.१६ एप्रिल) - म्हणतात ना 'देव तारी त्याला कोण मारी' असाच काहीसा प्रकार आज रविवार दि.१६ एप्रिल २०२३ रोजी सकाळच्या सुमारास परभणी रेल्वे स्थानकावर घडला धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेस परभणी रेल्वे स्थानकावर आली असतांना रेल्वे स्थानकाव सकाळी धर्माबाद ते मनमाड जाणारी हायकोर्ट एक्सप्रेस गाडी संख्या १७६८८ ही प्रवासी एक्सप्रेस गाडी परभणी स्थानकावर आली असतांना चालत्या गाडीत एका हातात चहाचा गिलास घेऊन चढण्याचा प्रयत्न करीत असतांना एक प्रवासी ज्याचा हात सटकल्यामुळे सरळ पायऱ्यात त्याचा पाय फसला सदरील प्रवासी धावत्या गाडीखाली जाण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास येताच रेल्वे सुरक्षा बलाचे ड्युटीवर कार्यरत असलेले जवान एम.जी.सुर्यवंशी यांनी तात्काळ धावत जावून त्या प्रवास्याला रेल्वे स्थानकावर ओढून त्याचा जीव वाचवला हा सर्व प्रकार रेल्वे स्थानकावरील सिसीटीलव्ही कॅमेरात कैद झाला.


परभणी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्तव्यतत्पर जवान एम.जी.सुर्यवंशी यांनी प्रसंगावधान राखत त्या प्रवास्याचा जिव वाचवण्याचे हृदयस्पर्षी कार्य केल्यामुळे श्री सुर्यवंशी यांचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या