🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या....!


🌟मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य भोवले, संजय राऊत यांना 100 कोटींच्या मानहानीची नोटिस🌟

 ✍️ मोहन चौकेकर

* संजय राऊत यांना दिल्लीत आल्यावर AK47 ने उडवून टाकण्याची धमकी; पुण्यातून दोन जण ताब्यात ; झेपत नसेल तर गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या, सुप्रिया सुळेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका ; दारुच्या नशेत संजय राऊतांना धमकी, चुकीचं काम करणाऱ्यांवर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

* राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे घेतली भेट, राजकीय व कृषी विषयावर झाली चर्चा 

* साई चरणी 3 दिवसांत 4 कोटींचे दान ; दक्षिणा पेटीत 1 कोटी, देणगी काउंटरवर 76 लाख, 171 ग्रॅम सोने आणि 2 किलो चांदी साई बाबांच्या चरणी अर्पण

* आता अनेक अल्प बचत योजनांवर 4% ते 8.2% पर्यंत व्याज दिले जाणार, केंद्र सरकारने नवीन आर्थिक वर्षात दिली मोठी खुशखबर

* मार्च 2023 पर्यंत रु. 1,60,122 कोटी एकूण GST महसूल गोळा, एप्रिल 2022 मधील संकलनानंतरचे दुसरे सर्वोच्च संकलन

* आज 1 एप्रिलपासून 6 अंकी अल्फान्यूमरिक हॉलमार्किंगशिवाय सोन्याची विक्री होणार नाही, सोन्यावर HUID असेल तरच होणार विक्री

* सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसाठी दरवर्षी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद, सन 2023-24 या वर्षासाठी 13,820 कोटी रूपये इतक्या निधीची तरतूद 

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य भोवले, संजय राऊत यांना 100 कोटींच्या मानहानीची नोटिस

* पेनकिलर,अँटी-इन्फेक्टीव्ह, अँटीबायोटिक्स आणि हृदयाची औषधे महाग होणार,भारत सरकारने औषध कंपन्यांना किंमती वाढवण्याची दिली परवानगी

* आयकरदात्यांना आजपासून नवीन कर प्रणाली मिळणार, आजपासून नवीन कर प्रणालीची निवड करणाऱ्यांसाठी सवलत मर्यादा 7 लाख रुपये

* व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळणार स्वस्त, किंमत झाली कमी; 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर 92 रुपयांनी स्वस्त

* सर्वसामान्यांना महागाईचा झटका! अमूलचे दूध पुन्हा महागले; लिटरमागे 2 रुपयांची वाढ

* पाटणा न्यायालयाचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 12 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश

* निधी मंजूर : कुसुमाग्रजांचे स्मारक होणार ‘मराठी भाषा अभ्यास केंद्र’, सत्यजीत तांबेंच्या आमदार निधीतून 50 लाख मंजूर

* काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांची १० महिन्यांनंतर तुरुंगातून सुटका

* धक्कादायक इंडिगोच्या विमानात प्रवाशाकडून एअर होस्टेसचा विनयभंग; मुंबई पोलिसांकडून अटक

* महाराष्ट्रात प्रचंड होळपणार व तापणार एप्रिल ते जूनमध्ये उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा अंदाज

* मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचे भाव 55000 रु तोळा 24 कॅरेट सोन्याचे भाव 6000 रु

* सुविधा संपन्न कुटुंब मिशन: ‘सुविधा संपन्न कुटुंब मिशन’ राबवून सर्वांगीण ग्रामसमृद्धी साध्य करण्यात येणार, शासननिर्णय राज्य शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध - मत्स्य व्यवसाय मंत्री मुनगंटीवार

* मराठी मनोरंजनसृष्टीच्या विकासासाठी चित्रपट निर्मितीपासून ते वितरणापर्यंतच्या सोयीसुविधा एकाच छताखाली मिळणार सुविधा, शासकीय पोर्टल लवकरच सुरु होणार 

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या