🌟नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा बोर्ड निवडणूक संदर्भात राज्य शासनाने ३ महिन्यात निर्णय घ्यावा...!


🌟मा.उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर (औ.बाद) खंडपीठाचे आदेश राज्य शासनासह गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाला आदेश🌟


नांदेड (दि.१९ एप्रिल) - नांदेड येथील हुजूर साहीब अबचल नगर सचखंड गुरुद्वारा बोर्ड निवडणूक घेण्यासंदर्भात जगदिपसिंग इतरांनी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.याचिकाकर्त्यांची बाजू न्यायालयांनी मान्य करीत राज्य शासनाला निवडणुक घेण्यासंदर्भात तीन महिन्याच्या आत निवडणूक प्रक्रियेचा निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत सचखंड गुरुद्वारा बोर्डाचा कार्यकाळ ९ मार्च २०२२ रोजी संपलेला आहे. गुरुद्वारा बोर्ड कायदयानुसार कार्यिकाळ संपण्याच्या ६ महिन्याच्या आदी म्हणजेच निवडणुक प्रक्रिया ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरु होणे क्रमप्राप्त होते.

निवडणूक प्रक्रिया रखडल्याने प्रशासकपदी सेवानिवृत्त पोलीस महासंचालक डॉ.परविंदरसिंघ पसरीच्या यांनी नेमणुक करण्यात आली . दरम्यान गुरुद्वारा बोर्डाची विका कामे व महत्वाचे निर्णय प्रलंबित राहत असत्याने जगदिपसिंग नंबरदार,राजेद्रसिंघ पुजारी, रणजीतसिंघ गिल,अमरजितसिंघ (राजु) महाजन व हरपालसिंघ संधू, यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये निवडणूक घेण्याबाबत याचिका दाखल केली होती. राज्य शासन ज्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आदी निवडणूका निर्धारित वेळेत घेते त्याप्रमाणे नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा बोर्डाची निवडणुकदेखील निर्धारित वेळेत घेत नव्हती मागील २० वर्षामध्ये फक्त तीन वेळा निवडणूक झालेली आहे. यासाठी स्थानिक शिख समाजातर्फे निवडणुक घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलने,मोर्चे,धरणे प्रदशने,आमरण उपोषण इत्यादी मार्गाचा उपयोग करावा लागत असे.

याचिका कर्त्याची बाजु ॲड.मृगेश नरवाडकर यांनी मांडली यावर न्यायमुर्ती नितीन सांबरे व एस.जी.चपळगावकर यांच्या खंडपीठाने दि.२७ मार्च २०२३ रोजी अंतिम निर्णय दिला आहे.मा.न्यायालयाने याचिकाकत्यांची मागणी मान्य करीत राज्य सरकार व गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाला तीन महिन्याचे आत निवडणुक संदर्भात निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. मा.न्यायालयाच्या या आदेशामुळे निवडणुक प्रक्रिया लवकरच सुरु होणार असल्याने शिख धर्मीयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या