🌟जिंतूर नगर परिषदे समोर संभाजी ब्रिगेड कडून नागरी सुविधा पुरविण्याच्या मागणीसाठी उद्या बोंबमारो आंदोलन...!


🌟संभाजी ब्रिगेडच्या वतीने बुधवार दि.05 एप्रिल रोजी नगर परिषद कार्यालयासमोर बोंबमारो आंदोलन करण्यात येणार🌟

जिंतूर (दि.04 एप्रिल) : जिंतूर शहरात नागरी सुविधा पुरवाव्यात या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने बुधवार दि.05 एप्रिल 2023 रोजी जिंतूर नगर परिषद कार्यालयासमोर बोंबमारो आंदोलन करण्यात येणार आहे.

           मागील काही दिवसांपासून शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसून शहरात स्वच्छतेचा बोजबारा उडाला आहे. शिवाय नागरिकांना पाणी पुरवठा वेळेवर मिळत नाही. यामुळे शहरातील नागरिकांचे हाल होत आहेत. वेळोवेळी मुख्याधिकार्‍यांना लेखी व तोंडी तक्रार करूनही नागरिकांच्या समस्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्यावतीने बुधवारी लोकशाही मार्गाने बोंबमारो आंदोलन करण्यात येणार आहे.

          संभाजी ब्रिगेडच्या वतीने याविषयी लेखी निवेदन देण्यात आले असून निवेदनावर विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. माधव दाभाडे, शहराध्यक्ष सुनील गाडेकर, सोपान धापसे, विजय पाटील, पिंटू डोंबे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या