🌟पुर्णा तालुक्यातीला ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपला सर्वाधिक १८ पैकी ०९ जागा....!


🌟तर काँग्रेस ०६ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ०३ जागा तर शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आला नाही 🌟

पुर्णा (दि.२९ एप्रिल) - पुर्णा तालुक्यातील ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक म्हणजे १८ पैकी ०९ जागा पटकावल्या तर सत्तारुढ काँग्रेसला ०६ तर त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने ०३ जागा मिळवण्यात यश आले असून या निवडणूकीत शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही.

         काँग्रेसचे नेते तथा ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अजित वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व १८ जागा लढविल्या परंतु काँग्रेसला केवळ ०६ जागाच हस्तगत करता आल्या तर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व बालाजीराव रुद्रवार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने या निवडणूकीत सर्वच्या सर्व १८ जागा लढविल्या त्यातून ०९ जागा पटकावून सर्वाधिक जागा मिळविण्याचा बहुमान मिळविला. विद्यमान सरपंच गजानन आंबोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ०४ जागा लढवल्या त्यापैकी ०३ जागी विजय मिळविला तर शिवसेनेने माखणी ग्रामपंचायतचे सरपंच गोविंद नाना आवरगंड,शिवसेना दलित आघाडी तालुका प्रमुख तथा मा.ग्रामपंचायत सदस्य सुरेश मगरे यांचे वडील सोपानराव मगरे,अनिल नरवटे हे ०३ उमेदवार रिंगणात उतरवले होते परंतु तिनही उमेदवार पडल्यामुळे एकही जागा शिवसेनेला हस्तगत करता आली नाही आणि शुन्यावर समाधान मानावे लागले.

          दरम्यान, भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा पटकावल्या खर्‍या, परंतु सभापती पद पदरात पडण्याकरीता भाजपासमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. कारण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढविल्या असल्या तरीही काँग्रेसने ०६ व राष्ट्रवादीने ०३ जागा मिळविल्या आहेत. आघाडीतील या दोन्ही मित्र पक्षाचे संख्याबळ ०९ एवढेच आहे. हे दोन्ही पक्ष सभापती पदाच्या निवडणूकीत एकत्र आल्यास भाजपासमोर ते मोठे आव्हानच ठरणार आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या