🌟जिंतूर येलदरी रस्त्याची दुरावस्था : अपघाताचे प्रमाणही वाढले......!


🌟पॉलिटेक्निक कॉलेज समोर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकास चांगलीच कसरत करावी लागत आहे🌟

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर : येथील जिंतूरहून येलदरी कडे जाणारा रस्ता आधीच अरुंद असून त्यावर वाढलेली वाहतूक आणि रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे अपघाताच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे . 

जिंतूरहून येलदरी कडे जाणाऱ्या रस्त्याला अनेक खेडी जोडलेली आहेत. त्यामुळे हा नेहमीच वर्दळीचा रस्ता आहे. त्यातच हा रस्ता अरुंद असून पॉलिटेक्निक कॉलेज समोर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकास चांगलीच कसरत करावी लागत आहे .या रस्त्यावर पॉलिटेक्निक कॉलेज ,डी एस एम कॉलेज तसेच न्यू ईरा इंग्लिश स्कूल कडे ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जिंतूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टर प्लॅटचे वाया जाणारे पाणी सतत या रस्त्यावरून वाहत असल्यामुळे दिवसेंदिवस खड्ड्यांची संख्या वाढत आहे.  रस्ता अरुंद आणि खड्डे पडल्याने अपघाताची संख्या वाढली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून  ये -जा करणारे विद्यार्थी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. फिल्टर प्लांटच्या  वाया जाणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करून रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर दुरुस्त  करण्यात यावेत अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून जोर धरत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या