🌟महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना असेही अभिवादन : चित्रकाराने लेखणीतून साकारल्या महापुरुषांच्या प्रतिमा....!


🌟पुर्णेतील चित्रकार संतोष सातपुतेंनी पेनाने गिरवले छ. शिवाजी महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर छ.शाहू महाराजांचे चित्र🌟

हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून कोट्यावधी बहुजनांना मुक्त करून स्वातंत्र्य,समता, बंधुता आणि न्याय ही मुल्ये जनमाणसात प्रस्थापित करणारे,भारतीय संविधानाचे शिल्पकार,परमपूज्य,महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीतीच्या पार्श्वभूमीवर पुर्णा शहरातील चित्रकार संतोष नाना सातपुते यांनी लेखणीतून क्रांतीकारी बदल घडवून तमाम बहुजनांना त्यांचा स्वाभिमान मिळवून देणाऱ्या जगविख्यात लेखण सम्राट डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांचे अत्यंत सुंदर असे चित्र साकारून या महापुरुषांना अनोख्या पध्दतीने अभिवादन केले.

पुर्णा शहरातील संतोष नाना सातपुते यांनी साकारलेल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज लेखणीतून अर्थात पेनातून साकारलेल्या चित्राचे सर्वस्तरातून कौतुक होत असून त्यांनी आपल्या कलेतून महामानवाला दिलेली आदरांजली निश्चितच कौतुकास्पद म्हणावी लागेल......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या