🌟छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाण्यात महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी...!


🌟विचारमंचावरून संविधान उद्देशिकेचे विक्रम गवई यांनी पाठान्तर करुन उपासक-उपासीका यांच्या कडून म्हणून घेतली🌟

छत्रपती संभाजीनगर (दि.१४ एप्रिल) - येथील चिकलठाण्यातील श्रावस्ती कॉलनी (सावित्रीनगर) येथे शुक्रवार दि.१४ एप्रिल २०२३ रोजी विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


यावेळी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची सुरुवात विचारमंचावरून संविधान उद्देशिकेचे विक्रम गवई यांनी पाठान्तर करुन उपासक-उपासीका यांच्या कडून म्हणून घेतली तर प्रा.राम कदम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे सामजिक विश्लेषण आणि आजची स्थिती या विषयावर व्याख्यान दिले यावेळी प्रमुख पाहुने म्हणून सहा.पोलिस निरिक्षक आरती जाधव महिला तक्रार निवारण केन्द्र छत्रपती संभाजीनगर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी त्यांनी नाचुन नव्हे तर वाचुन महापुरुषांची जयंती साजरी करण्याचा मुलमंत्र उपस्थितांना दिला.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनील साळवे यांनी केले प्रस्ताविक अ‍ॅड.तेजराव वानखेडे यांनी तर आभार प्रा.नंदा समाधान सातपुते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन प्रा.रत्नदिप वेडे,प्रदीप झोटे,विनोद वानखेडे, भगवान पवार,अशोक खरात,राजेश काळे,सुखदेव मस्के,यांनी केले तसेच समस्त जयंती मंडळ,श्रावस्ती महिला संघ,श्रावस्ती धम्म सेवा संघ, कार्यकर्ते,पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या