🌟सामाजिक न्याय पर्व अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता विशेष मोहिमेचे आयोजन....!


🌟मोहिमेचे आयोजन यान दिनांक ०१ एप्रिल ते दि.०१ मे २०२३ या कालावधीत राबविण्यात येत आहे 🌟

पुर्णा (दि.०७ एप्रिल) : जिल्हा जातषप्रमाणपत्र पडताळणी समिती परभणी यांच्या वतीने इयत्ता ११ वी १२ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन सामाजिक न्याय वविशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने राज्यामध्ये सामाजिक न्याय पर्व अभियान दिनांक ०१.०४.२०२३ ते दि.०१.०५.२०२३ या कालावधीत राबविण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत रामाजिक न्याव विभागाच्या अधिनस्त कार्यरत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती परभणी यांच्या वतीने परभणी जिल्ह्यातील इयत्ता ११ वी व १२ वीविज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी करीता विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोहिमेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये इयत्ता १२ विज्ञान शाखेची परिक्षा दिलेल्या अनूसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या मागास प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज समिती कार्यालयात सादर केले नाहीत अशा विद्यार्थ्याकरीता शेवटची संधी म्हणून दिनांक ०१.०४.२०२३ ते दि.०१.०५.२०२३ या कालावधीत जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करुन घेणे व अशा विद्यार्थ्यांपैकी परिपूर्ण प्रकरणात संबंधीत विद्यार्थ्यांना तात्काळ जात वैधता प्रमाणपत्र देणे या करिता विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी अशा सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज भरुन सदर अर्जाची हार्ड कॉपी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती परभणी या कार्यालयात सादर करावीत तसेच जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये इयत्ता १२ विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहेत, अशा विद्यार्थ्यांनीही सदर कालावधीत त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज समिती कार्यालयास दाखल करता येतील इयत्ता १२ वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी तसेच फी माफीचा लाभ घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक असल्याचे इच्छूक विद्यार्थ्यांनी तात्काळ त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज समिती कार्यालयास सादर करावेत असे आवाहन दिनकर जोशी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीसमिती परभणी यांच्यावतीने करण्यात येत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या