🌟परळीत जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे याच्याकडून नियोजित विविध संस्थांच्या जागेला भेटी....!


🌟परळी नगरपालिका हद्दीत भुयारी गटार योजना अंतर्गत चालू असलेल्या कामांची केली पहाणी🌟

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बिड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ (मुंडे) यांनी आज परळी वैजनाथ येथे (1)केंद्रीय विद्यालय परळी तालुक्यात चालू करण्यासाठी जागेची पहाणी केली.(2)परळी  नगरपालिका हद्दीत भुयारी गटार योजना अंतर्गत चालू असलेल्या कामांची पहाणी केली.(3)परळी शहरात हिंदू-हदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चालू करण्यासाठी जागेची पहाणी(4) तालुका क्रिडा संकुल साठी जागेची पहाणी केली.(5) परळी- नगर   रेल्वे साठी ॲप्रोच रेल्वे पटडी साठी पहाणी केली.दुपारी 12 ते 3-30 या वेळेत भर उन्हात  पहाणी केली.यावेळी उपजिल्हाधिकारी  नम्रता चाटे, औष्णिक विद्युत केंद्राचे  मुख्य अभियंता प्रफुल्ल  भदाने, तहसीलदार सुरेश शेजूळ, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्रिबक कांबळे,  पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय केंद्रे, न.प,चे  कार्यालय अधिक्षक संतोष रोडे, डाॅ लक्षमण मोरे  तालुका आरोग्य अधिकारी ,श्री कनाके सर गशिअ व  संबधित विभागातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या