🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत निवडणूक चिन्ह वाटपापुर्वीच चिन्हाचा वापर ?


🌟निवडणूक निर्णय अधिकारी बोलेलू यांची दिले चौकशी करुन गुन्हे दाखल करण्याचे आदेश🌟


पुर्णा (दि.२१ एप्रिल) - कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक सन २०२३ चा कार्यक्रम जाहीर झाला असून या निवडणुकीसाठी प्राप्त नामनिर्देशन पत्र परत घेण्याची शेवटची तारीख २० एप्रिल अशी होती तर शुक्रवार दि.२१ एप्रिल रोजी निवडणूक कार्यक्रमा प्रमाणे सकाळी ११ वाजता चिन्ह वाटपाची तारीख नियोजित करण्यात आली होती परंतु दि.२० एप्रिल २०२३ रोजीच नामनिदेशन पत्र वापस घेण्याच्या दिवशीच जय किसान सहकारी विकास पॅनल च्या सर्व उमेदवार व कार्यकत्यांनी चिन्ह वाटप झालेले नसताना सुध्दा त्यांच्या सोशल मिडिया द्वारे म्हणजेच वॉट्सअप फेसबुक व गावोगाबी होल्डीग बँनर लावून त्यामध्ये  त्यांनी त्याचे निवडणूक चिन्ह विमान दर्शविले व त्यांच्या निवडणूक पॅनलचे नाव जय किसान सहकारी विकास पॅेनल असे लिहिले सदरील बाब निवडणूकीत विरोधक असलेल्या अर्जदार यांच्या निदर्शनास आल्यानंतर अर्जदाराने आपल्या भ्रमर्णध्वनी द्वारे निवडणूक निर्णय अधिकारी नितेशकुमार बोलेलू यांना संपर्क करुन तोड़ी तक्रार नोंदवली याच दिवशी दि.२० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ०६-०० वाजेच्या सुमारास समक्ष जाऊन तक्रार दिली व  सोशल मिडिया वरिल बॅनर लावलेले व बॅलेट पेपर ज्यावर निवडणूक निशानी विमान दर्शविले असल्याचे निदर्शनास आणून दिले.


निवडणूक चिन्ह वाटपाची तारिख घोषित निवडणूक कार्यक्रमा प्रमाणे आज शुक्रवार दि.२१ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११-०० वाजल्या पासून सुरू होणार होती तरी पण त्या अगोदरच सोशल मिडियावर चिन्हा सहित पोस्ट टाकणे हा आंचार संहितेचा भंग आहे व कायद्याप्रमाणे गुन्हा आहे. एवढेच नव्हे तर संबधिताने अर्जदाराच्या मागील निवडणुकीतील पॅनलचे नाव देखील बेकायदेशीररित्या वापरले आहे. तर अर्जदाराने रितसर विमान किंवा कपबशी या चिन्हाची मागणी केली होती त्या अगोदरच सदरील अर्जदाराने मागणी केलेले चिन्ह बेकायदेशीररित्या कोणाच्या संमतीने निवडणूक आचार संहितेचा भंग करीत निवडणूक चिन्ह वाटपापुर्वीच संबधीत गैरअर्जदाराने सोशल मिडिया वाट्सअप फेसबुक ईत्यादी व गावोगावी बॅनर लावून मनमानी पध्दतीने आचारसंहीतेचा भंग केला ? असा प्रश्न उपस्थित होत असून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पठाण यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत असून या संदर्भात अर्जदार लक्ष्मीकांत रमाकांत सुर्यवंशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी श्री.बोलेलू यांना जाब विचारताच त्यांनी तात्काळ या संदर्भात ताडकळस पोलिस प्रशासनाला चौकशी करून तात्काळ गुन्हा दाखल करीत अहवाल सादर करण्याचे आदेश आज शुक्रवार दि.२१ एप्रिल २०२३ रोजी जारी केले....  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या