💥पूर्णेतील पवार महाविद्यालयात महात्मा जोतीराव फुले यांना अभिवादन....!


🌟या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.पी.डी.सूर्यवंशी यांनी केले🌟

पुर्णा (दि.१२ एप्रिल) - येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात आधुनिक भारताच्या सामाजिक क्रांतीचे प्रणेते राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.पी.डी.सूर्यवंशी यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. प्रकाश सूर्यवंशी यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या