🌟पुर्णा नगर परिषद प्रशासन देतेय अस्वच्छतेला प्राधान्य : आंतरराष्ट्रीय मलेरिया दिन सप्ताहाचा मुख्याधिकाऱ्यांना विसर ?

 


🌟शहरात जागोजाग कचऱ्याची ढिगार तुंबलेल्या नाल्या अन् डासांच्या झुंडी नगर परिषद मारतेय बोगस विकास कामात मुसंडी🌟

विशेष वृत्त - चौधरी दिनेश (रणजीत) 

'स्वच्छ शहर,सुंदर शहराचे' स्वप्न नागरिकांना दाखवून सत्ता प्राप्त करणाऱ्या लबाडांना पाच वर्षाच्या कालावधीत नागरिकांना नागरी सुविधा पुरवण्याची देखील अक्कल नसते परंतु राज्य शासनासह केंद्र शासनाकडून नागरी सुविधांसह शहराच्या विकासासाठी तसेच शहरातील स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत अभियान,स्वच्छ महाराष्ट्र अभियान,संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान या योजनांतर्गत प्राप्त होणारा कोट्यावधी रुपयांचा शासकीय निधी प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या संगणमतातून भ्रष्ट व बेअक्कल लोकप्रतिनिधी आणि भ्रष्ट बेईमान गुत्तेदारांच्या घषात घालण्याच्या सावळ्या गोंधळात आपण जनसामान्यांशी दगलबाजी करीत आहोत याचे देखील या भ्रष्ट बेईमानशाहीला भान नसते.


महाराष्ट्र शासनासह केंद्र शासन स्वच्छतेसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी जिल्हा परिषद,महानगर पालिका,नगर पालिका,नगर पंचायतींसह ग्राम पंचायतींना उपलब्ध करुन देत असते परंतु आलेला निधी नियोजनबध्द पध्दतीने विकासकामांसह स्वच्छतेवर कागदोपत्री खर्च झाल्याचे दाखवून शासनासह जनसामान्यांची देखील फसवणूक कश्या पध्दतीने केली जाते याचे जिवंत उदाहरण म्हणजे परभणी जिल्ह्यातील पुर्णा नगर परिषद म्हणावी लागेल घोटाळ्यांमध्ये मुक्त विद्यापिठातून जणूकाही यांनी पिएचडीच केली की काय ? असा प्रश्न जनसामान्यांमध्ये सातत्याने उपस्थित होतो उद्या मंगळवार दि.२५ एप्रिल २०२३ रोजी जागतिक मलेरीया दिन असून पसरलेल्या अस्वच्छता आणि तुंबलेल्या नाल्यांतून निर्माण होणाऱ्या डासांच्या वाढत्या संख्येमुळे मलेरीयासह डेंग्यू काविळ,टायफाईड आदी जिवघेण्या संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध व्हावा


 याकरिता जागतिक पातळीवर मलेरिया- हिवताप आजाराच्या उच्चाटनासाठी २५ एप्रिल या दिवशी जागतिक मलेरिया दिन साजरा केला जात असतो कारण भयान वास्तव असे आहे की जगभरात प्रत्येक दोन मिनिटांना एका बाळाचा अथवा लहान मुलाचा मृत्यू केवळ मलेरियाने होत असतो ही जागतिक पातळीवरील सरासरी आहे. मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे डासांद्वारे त्या मलेरीयासह अन्य रोगांचा प्रसार होतो. याचा प्रादुर्भाव विषुववृत्तीय भागांत जास्त आहे. आपण डॉक्टर नाही, तरी सतर्कतेसाठी हे ठावे असावे. मलेरियाचे गांभीर्य लक्षात घेता जागतिक मलेरिया दिन पाळण्याची निकड भासू लागल्यामुळे जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यूएचओ व आरबीएम संयुक्तरित्या कार्य करीत असतांना मात्र स्थानिक पातळीवर स्वच्छते प्रती प्रशासन किती निष्क्रिय असते याचा प्रत्यय पुर्णा शहरातील परिस्थिती बघितल्यास नक्कीच निदर्शनास येईल.


पुर्णा नगर परिषद प्रशासनाचा कारोभार 'आंधळ दळतय अन् कुत्र पिठ खातय' असा झाल्यामुळे अनपेक्षित व आवश्यकता नसलेल्या ठिकाणी कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी अत्यंत निकृष्ट व बोगस सिमेंटरोड/सिमेंट नाल्यांसह मिनी गार्डनसह कागदोपत्री स्वच्छतेवर उधळून 'दाल अजय..ब्दुल्ला गुड थैली में' असा झाल्याने शेवटी जाता जाता चांगभल करीत बोगस निकृष्ट कामांची बिल अदा करीत भ्रष्ट मुख्याधिकारी नरळेंनी रात्रीच्या वेळी नगर परिषद कार्यालयात हजर होत शासकीय विकासाच्या नरड्याचा घोट घेतल्याचे पाहावयास मिळाले विकासाच्या नावावर कोट्यावधी रुपयांच्या विकासनिधीची विल्हेवाट लावीत असतांना नगर परिषद प्रशासनातीला भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांना याचे सुध्दा भान राहिले नाही की आपण शहरातील स्वच्छतेला मुठमाती देऊन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत आहोत.


पुर्णा शहरातील मुख्य बाजारपेठेतील दर्शनी भागांसह विविध प्रभागातील नागरी वसाहतींमध्ये जागोजाग कचऱ्यांची साचलेली ढिगार स्वच्छते अभावी जागोजाग तुंबलेल्या नाल्यांसह नाल्यांतून सार्वजनिक रस्त्यांवर तसेच परिसरात वाहणारे गलिच्छ पाणी,नगर परिषद पाणीपुरवठा योजनेतील पाईप लाईन काही भागांत फुटल्याने नाल्यांतून होणारा अस्वच्छ व जंतुयुक्त पाणीपुरवठा यामुळे शहरात भर उन्हाळ्यात डासांची प्रचंड प्रमाणात वाढलेली संख्या मलेरीया डेंग्यू टायफाईड,काविळ सारख्या संसर्गजन्य रोगांना निमंत्रण देत असून या सर्व परिस्थितीस नगर परिषद प्रशासन जवाबदार असल्यामुळे या आजारांमुळे एक जरी व्यक्ती दगावला तरी नगर परिषद प्रशासनातील निष्क्रिय अधिकाऱ्यांना जवाबदार धरुन त्याच्यावर सदोष मनुष्य हत्येचा गुन्हा दाखल का करण्यात येवू नए ? असा प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे परभणी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी वेळीच दखल घेऊन नगर परिषदेला शहरातील स्वच्छते संदर्भात तसेच शहरात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या निकृष्ट व बोगस विकासकामां संदर्भात कारवाईचे आदेश जारी करावेत.....



  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या