🌟महापुरुषांच्या विचाराचा वारसा घेवून चालण्याचा प्रयत्न करणे हीच खरी भीम जयंती साजरी करणे होय....!


🌟शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम यांचे प्रतिपादन🌟


पुर्णा (दि.२९ एप्रिल)
- पुर्णा तालुक्यातील कानडखेड येथे महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती दि.२७ एप्रिल २०२३ रोजी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी भिम जयंती महोत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणूकीत महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह महाराष्ट्राचे आराध्य दैवत बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज,पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर,हजरत टिपू सुलतान,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा लावून राष्ट्रीय सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडवत ऐतिहासिक भिम जयंती साजरी होतांना संपूर्ण तालुक्यातील नागरिकांना पहावयास मिळाली.


 यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवास प्रमुख उद्घाटक म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम,तर प्रमुख पाहुणे म्हणून पुर्णा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक परभणीरत्न उत्तमभैया खंदारे, प्रमुख वक्ते प्रा.मास्टर अनिल कांबळे,बिएसपी नेते देवरावदादा खंदारे, सामाजिक कार्यकर्ते संजय जल्हारे,सरपंच प्रताप बखाल,नाना बुद्धे,संतोष पारटकर,पोलिस अधिकारी मा.भिसे साहेब,आजी माजी ग्रा.पं सदस्य व गावकरी मंडळी उपस्थीत होते,कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडणाऱ्या पोलीस प्रशासनाने व आलेल्या मान्यवरांचे व गावकऱ्यांचे युवानेतृत्व अशोक वाघमारे यांनी आभार व्यक्त केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या