🌟महापुरुषाचे विचार आत्मसात करत वाचन संस्कृती जतन करा - डॉ. के.राजकुमार


🌟महाविद्यालयातील 132 विदयार्थ्यांनी पाच तास अभ्यास करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन🌟


पुर्णा (दि.18 एप्रिल) - येथील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयाच्या तत्वज्ञान विभाग व समाजशास्त्र विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त वाचन संस्कृती जतन करण्यासाठी महाविद्यालयातील 132 विदयार्थ्यांनी पाच तास अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन केले. वाचन संस्कृती जतनच्या सकाळच्या सत्रात विद्यार्थी अभ्यास करताना महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. संजय दळवी,प्रो.पी.व्ही.भुताळे,श्री अरुण दुब्बेवार  डॉ. पुष्पा गंगासागर, डॉ.जी.पी.कापुरे,श्री गिरीष शिवणकर डॉ. उषा मगरे, डॉ. रेखा पाटील, डॉ. मनीषा पाटील डॉ. वर्षा प्रा. बालाजी असोरे  डॉ.जयश्री स्वामी डॉ. वृषाली आंबटकर इत्यादी उपस्थित होते.वाचन संस्कृती जतनच्या समारोप प्रसंगी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार, उपप्राचार्य श्रीमती फातेमा शेख,डॉ. शिवसांब कापसे, डॉ. सोमनाथ गुंजकर हे उपस्थित होते सहभागी झालेल्या विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. के. राजकुमार यांनी म्हटले कि,तरुणांमध्ये वाचन वेड उत्पन्न व्हायचे असेल तर तशी परिस्थिती त्यांच्याभवती निर्माण होणं गरजेचं आहे. वाचनाने माणूस मोठा होत असतो. पुस्तकांचे वाचन कराल तेवढेच ज्ञान वाढत जाईल. ग्रंथ हे गुरू आहेत. अलीकडच्या काळात आपल्या मोबाईल फोनवरसुद्धा विशिष्ट नंबर फिरविल्याबरोबर आजच्या घडीला जगातील कानाकोप-यात घडणा-या घटकांची अद्ययावत माहिती प्राप्त होते. जुन्या पिढीपाशी ही अद्ययावत साधने नसल्यामुळे जास्तीत जास्त वाचनातून ते आपली ज्ञान-लालसा भागवत असत.मात्र आज वाचनासाठी अनेक उत्तम साधने हातात उपलब्ध असूनही तरुण पिढी वाचनापासून दूर जात आहे. ती मोबाईलच्या आहारी जाऊन आणि इंटरनेटवर वेळ घालवत असल्याचे आजचे चित्र आहे. त्यांना वाचनासाठी वेळ उपलब्ध नसतो. नव्या माध्यमांच्या आगमनानं वाचन संस्कृती लोपपावत आहे. तरुणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना वाचनाचे महत्त्व कळावे यासाठी विविध उपक्रमांद्वारे जनजागृती निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.  ‘तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्त्व घडवायचे असेल तर वाचन करा’ असा संदेश त्यांनी दिला.थोर पुरुषाच्या जयंती बरोबरच त्यांचे विचार आत्मसात करा तर खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचा वारसा आजचे युवक साध्य करतील ही अपेक्षा व्यक्त करत अशा स्वरूपाचे कार्यक्रम व्हावेत जेणेकरून महानपुरुषाच्या विचाराचा जागर महाविद्याल्यामार्फत विदयार्थ्यांनं पर्यत पोहचविण्याच्ये कार्य यामधून साध्य होईल.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या