🌟पुर्णा नगर परिषदेतील कोट्यावधी रुपयांच्या बोगस कामांच्या चौकशीवर मुख्याधिकाऱ्यांच्या बदली आदेशाने अखेर पडदा ?


🌟मुख्याधिकारी नरळेंनी बोगस विकासकामांसह नियोजित विकास कामांची प्राथमिक बिल जाण्यापुर्वीच रात्रीत केली अदा ?🌟


पुर्णा (दि.२० एप्रिल ) - पुर्णा नगर परिषद मुख्याधिकारी पदाचा पदभार मागील दिड वर्षांपूर्वी स्विकारलेले मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या कार्यकाळात नगर परिषदेला राज्य शासनासह केंद्र शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी प्राप्त झाला परंतु कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी प्राप्त झाल्यानंतर देखील शहरातील विविध प्रभागांमध्ये म्हणावा त्या पध्दतीने विकास झाला नाही केवळ विकासनाट्य रचून करोडो रुपयांच्या शासकीय विकासनिधीची सोईस्कररित्या विल्हेवाट लावण्याचे काम मुख्याधिकारी अजय नरळे यांनी नगर अभियंता पदाचा प्रभारी पदभार बेकायदेशीररित्या संगणक अभियंता सिध्दार्थ गायकवाड यांना बहाल करून त्यांच्यासह वादग्रस्त सब ओव्हरसियर संजय दिपके,ओ.एस.बाबर,लेखापाल कैलास माकुलवार यांच्यासह भ्रष्ट गुत्तेदार,भ्रष्ट लोकप्रतिनिधींना हाताशी धरून केल्याचे निदर्शनास येत असतांना या भ्रष्ट व बेबंदशाही विरोधात नागरिकांकडून वारंवार होणाऱ्या तक्रारींसह प्रसार माध्यमातून प्रकाशित होणाऱ्या वृत्तांना देखील न जुमानता आपला भ्रष्ट कारभार सोईस्कररित्या चालवत करोडो रुपयांच्या विकासनिधीची विल्हेवाट लावण्याचे काम केले.  

पुर्णा नगर परिषदेतील या भ्रष्ट कारभाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी केली जाईल व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतांनाच दि.१७ एप्रिल २०२३ रोजी मुख्याधिकारी अजय नरळे यांना त्यांची लातूर जिल्ह्यातील चाकूर नगर पंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून बदली करण्यात आल्याचे आदेश सोपवन्यात आले आदेश प्राप्त होताच मुख्याधिकारी नरळे यांनी त्याच दिवशी रात्री ०९-१५ ते ०९-४० वाजेच्या दरम्यान आपल्या वैयक्तिक कार मधून पुर्णा नगर परिषद कार्यालयात दाखल होऊन शहरातील निकृष्ट व बोगस विकासकामे केलेल्या व नियोजित विकासकामांच्या भ्रष्ट गुत्तेदारांच्या देयकांवर गडबडीने स्वाक्षरी करीत जाताजाता देखील आपले हात वाहत्या गंगेत धुवून घेतल्याचे नगर परिषदेच्या सुत्रांकडून समजले.

पुर्णा नगर परिषदेत निकृष्ट व बोगस विकासकामांची मालिका सोईस्कररित्या चालवून मुख्याधिकारी नरळे यांनी दि.१८ एप्रिल २०२३ रोजी चाकूर नगर पंचायतीचे मुख्याधिकारी पदाचा पदभार स्विकारत 'पुढे पुन्हा भ्रष्टाचाराचा पाठ मागील भ्रष्ट कारभार सपाट' असा नियोजनबध्द कारभार राबवला असला तरीही या संदर्भात सखोल चौकशी करुन संबंधित अधिकाऱ्यांसह भ्रष्ट गुत्तेदारांवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी आता जनसामान्यांतून होत असून या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची तक्रार लवकरच मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री/नगरविकास मंत्री यांच्यासह प्रवर्तन निर्देशालयाकडे दाखल केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे......  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या