🌟निरोगी जीवनासाठी संतुलित आहार आवश्यक -- डॉ .हेमा माखणे


🌟ज्ञानोपासक महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या म्हणाल्या🌟

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर : विद्यार्थ्यांचे शारीरिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी दैनंदिन दिनचर्या व संतुलित आहार आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ.हेमा माकणे यांनी केले येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिना निमित्त आरोग्य विभागाच्या वतीन आयोजित कार्यक्रमात  विद्यार्थी व त्यांचे आरोग्य आणि आहार या  विषयावर त्या बोलत होत्या

यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीधर भोंबे  उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. हेमा माकणे म्हणाल्या की, प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले व आपल्या घरचे सर्वांचे आरोग्य व त्यांना लागणारा योग्य आहार ज्या आहारापासून आपले जीवन निरोगी राहील याची काळजी घेतली पाहिजे. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीधर भोंबे म्हणाले की निरोगी जीवन जगण्यासाठी विद्यार्थ्यांनी संतुलित आहार घ्यावाच त्यासोबतच योगासने आणि प्राणायाम  नियमित करणे आवश्यक आहेत .कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयातील आरोग्य विभागाचे समन्वयक प्रा. डॉ .बी.जी.ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. आय. एम. शेख,व आभार प्रा.डॉ.माणिक खंदारे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील  विद्यार्थी, शिक्षक व  कर्मचारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या