🌟परभणी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी....!


🌟बेरोजगारांसाठी दि.२६ एप्रिल ऑनलाईन ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन🌟

परभणी (दि.१८ एप्रिल) : राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या विद्यमानाने सुशिक्षित बेरोजगारांसाठी दि.२६ एप्रिल २०२३ रोजी ऑनलाईन ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये विविध नामांकित उद्योजक, कंपन्या सहभाग नोंदविणार असून, जास्तीत जास्त पदांची भरती करण्यात येणार आहे.

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी  www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे....... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या