🌟जिंतूर नगर परिषद प्रशासनाने मंदिरा वरील भगवा ध्वज काढल्याने काही काळ तणावाचे वातावरण....!


🌟निषेधार्थ बाजारपेठ बंद मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात ठिय्या🌟


जिंतूर प्रतिनिधी  / बि.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.१३ एप्रिल) - जिंतूर नगर परिषद प्रशासनाकडून शहरातील रामनवमी व हनुमान जयंती निमित्त लावण्यात आलेले धार्मिक भगवे ध्वज कोणतीही पूर्व सूचना न देता काढण्यात आले यावेळी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील शनिमंदिरावरचे ही धार्मिक ध्वज काढल्यामुळे आज गुरुवार दि.१३ एप्रिल रोजी जिंतूर शहरात काही काळ तणाव निर्माण झाला घटनेच्या निषेधार्थ समाज बांधवांच्या वतीने मोर्चा काढत पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी मुख्याधिकाऱ्यांवर पुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली जिंतूर शहरातील बाजारपेठ काही काळ कडकडीत बंद होती कोणतीही पूर्व सूचना न देता नगर परिषद कर्मचाऱ्यांनी झेंडे काढून कचऱ्याच्या गाडीत टाकल्यावरून यावेळी तणाव निर्माण झाला समाज बांधवांचा एक मोठा जमाव तहसील कार्यालया जवळ जमा झाला ही बाब बाजारपेठेत पसरतात तात्काळ बाजारपेठ बंद झाली थोड्यावेळाने जमावणे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला जोपर्यंत मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून उठणार नाही असा पवित्रा जमावाने घेतला तब्बल दिड तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे तहसीलदार अमित घाडगे मुख्याधिकारी जगताप पोलीस ठाण्यात दाखल झाले.

तसेच या प्रकरणात गुन्हेगार अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात जमावणे हट्ट धरला शनी मंदिरावरील भगवा ध्वज एका मुस्लिम कर्मचाऱ्यामार्फत काढण्यात येतो कसा असेही तक्रारीत नमूद करण्यात आली असून मुख्याधिकारी यांनी रोडवरील साईडचे खांबा वरील ध्वज काढावयास पाहिजे असतांनी मुद्दाम होऊन समाजामध्ये वाद निर्माण होणाऱ्या हेतूने नगरपरिषद जिंतूरचे मुख्याधिकारी यांनी कर्मचारी यांनी  लोकांच्या व्यक्तिगत मालकी च्या जागेतील तसेच मंदिरावरील भगवे झेंडे काढले आणि ते झेंडे धर्मांच्या अपमान करण्याचे हेतूने नगरपरिषद जिंतूर यांच्या मालकीच्या कचरा वाहतूक करण्याच्या घंटागाडी मध्ये टाकली सदरील बाब पोलीस स्टेशन जिंतूर यांना निर्देश आणून दिल्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी तक्रार देण्यास दिलेल्या शिष्टमंडळात उद्धटपणे बोलून कारवाई केल्याने काय होते ? निलंबित केल्याने काय होते? अशा प्रकारे बोलून तिथे तक्रार देण्यात आलेले शिष्टमंडळात उद्धटपणे वागून गैरवर्तन केले प्रशासनाला  जिंतूर शहरांमध्ये या प्रकरणावरून काय सिद्ध करायचे होते ?असाही प्रश्न जनतेत उपस्थित होत आहे.

सदरील निवेदनावर लक्ष्मण बुधवंत, गंगाप्रसाद घुगे ,प्रदीप चौधरी ,एडवोकेट मनोज सरडा, अडवोकेट कपिल निकम, अमोल देशमुख ,दत्तात्रय कटारे ,बाळासाहेब काजळे प्रशांत रोकडे ,अविनाश देशमुख, भारत मेहता ,प्रदीप चौधरी ,रोहन देशमुख ,कृष्णा सांगळे, रंगनाथ मुटकुळे, प्रदीप राठी, प्रकाश सोनी, आकाश राहटे आदी सर्व पक्षीय पदाधिकारी व नागरिकांच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या