🌟मराठवाडा एक्स्प्रेस मध्ये प्रवास्याची विसरून राहिलेली बॅग शोधून काढण्यात अखेर यश...!


🌟प्रवासी सेना टिमच्या वतीने बॅग शोधून लोहमार्ग पोलिस प्रशासनाच्या स्वाधीन🌟

छत्रपती संभाजीनगर (दि.२९ एप्रिल) - धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेसच्या डि-४ मधून प्रवास करणारे प्रवासी वेदांत राणे यांची बॅग प्रवासा दरम्यान कोचमध्ये विसरला त्यांनी तात्काळ ह्या बॅग विषयी लोहमार्ग पोलीस कर्मचारी यांना माहिती दिली.

यावरून ही माहिती लोहमार्ग पोलिस प्रशासनाचे एएसआय माधव दासरे व पोकॉ.सिरसाट यांनी रेल्वे सेना टीम सदस्य धुरन व रफिक शेख यांना माहीती देण्यात आली सदरील बॅग प्रवासी सेना टिमच्या वतीने शोधुन लासूर स्टेशन येथे रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना सुपुर्द केली हि बॅग लोहमार्ग पोलीस स्टेशन संभाजीनगर मार्फत मूळ प्रवासी वेदांत राणे यांना आज शनिवार दि.२९ एप्रिल रोजी दुपारी परत देण्यात येणार आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या